दिवाळीच्या या सणाला आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. आजच्या लेखामध्ये तुम्हाला मिठाईच्या दुकानामध्ये मिळणाऱ्या बुंदीच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. सणासुदीच्या दिवसांत घरी मिठाई बनवणे हा एक आनंददायी अनुभव असतो. घरगुती मिठाईला एक वेगळीच चव असते आणि तुम्ही गोडवा नियंत्रणात ठेवू शकता, ज्यामुळे कमी खर्चात जास्त मिठाई बनवून खाता येते. बुंदीचे लाडू घरच्या घरी कसे तयार करायचे यासंदर्भात सविस्तर वाचा.
बेसन – 2 कप
केशर खाद्य रंग – चिमूटभर
पाणी – गरजेनुसार
खाण्याचा सोडा – 1/4 चमचा
तेल – तळण्यासाठी
साखर – दीड कप
पाणी – एक कप
केशर खाद्य रंग – पाव चमचा
वेलची पूड – अर्धा चमचा
लिंबाचा रस – एक चमचा
पिस्ता – 2 चमचे
बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बुंदी तयार करावी लागणार आहे. बुंदी तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 2 कप बेसन घ्या. त्यात केशरी खाद्यरंग (Food Colour) आणि पाणी घालून एकत्र मिसळा. बुंदीच्या मिश्रणामध्ये मिश्रणात गुठळ्या नाहीत याची खात्री करा. मिश्रण जास्त घट्ट असल्यास, त्यात हळूहळू पाणी घाला. लक्षात ठेवा की जास्त पाणी घातल्यास बुंदी चपटी होते आणि मिश्रण जास्त घट्ट झाल्यास तिला शेपटीसारखा आकार येतो. जेव्हा मिश्रण तयार होईल, तेव्हा त्यात खाण्याचा सोडा घाला. आता बुंदी तळण्याची वेळ झाली आहे, पीठ चाळणीवर ओता आणि गरम तेलात सोडा. बेसनाचे पीठ हळूहळू ओता, जेणेकरून ते चाळणीतून थेंब-थेंब तेलात पडेल. तरच बुंदी चांगली होईल. एकाच वेळी खूप जास्त बुंदी टाकणे टाळा, कारण त्यामुळे त्या चिकटतील.
जेव्हा बुंदी शिजून कुरकुरीत दिसेल, तेव्हा ती बाहेर काढून किचन पेपर किंवा किचन टॉवेलवर ठेवा. त्यानंतर तुम्हाला पाक तयार करायचा आहे यासाठी, एका पातेल्यात दीड कप साखर आणि एक कप पाणी 2 मिनिटे किंवा पाक तयार होईपर्यंत उकळवा. पाक चिकट होणार नाही याची काळजी घ्या. तो पातळच असायला हवा. गॅस बंद करा आणि या पाकात केशराचा खाद्यरंग, लिंबाचा रस आणि वेलची पूड घाला. आता पाकात बुंदी, कापलेले पिस्ते आणि काजू घाला. व्यवस्थित मिसळा जेणेकरून पाक प्रत्येक बुंदीला समान रीतीने लागेल. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर लाडू बनवायला सुरुवात करा. लाडू हळुवारपणे वळा. हे बुंदीचे लाडू बनवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवल्यास ते आठवडाभर म्हणजेच 7 दिवस खाल्ले जाऊ शकतात.