• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

IND VS NZ ODI 2nd Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिजमधील दुसरा सामना हा 7 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तेव्हा हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता पाहायला मिळेल याविषयी माहिती जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 05, 2026, 08:25 PM IST|Updated: Nov 05, 2026, 09:07 PM IST
joinshare
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

2

भारताने पाकिस्तानला आणखी एकदा हरवलं! टीम इंडियाची विजयी सुरुवात

3

पायल झांबरेंच्या परिवाराला एकनाथ शिंदेंचा फोन, काय दिलं आश्वासन? 'या प्रकरणात मी स्वतः...'

4

दिल्लीच्या वायुप्रदूषणा समोर BCCI ही नमलं, भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्याचं ठिकाण बदललं

5

लग्नातील जेवणासाठी FDAची परवानगी आवश्यक, नियमावर काय म्हणाले तुकाराम मुंढे?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ ODI 2nd Match  : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना हा 4 नोव्हेंबर रोजी ऑकलँड येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड भारताची ही आघाडी मोडीत काढून बरोबरी साधते की भारतीय संघ सामना जिंकून आपली आघाडी अधिक मजबूत करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेव्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना, कुठे, कधी आणि केव्हा खेळवला जाईल आणि सुरु होईल याबाबतचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊयात.

पहिल्या वनडे सामन्यात काय घडलं?

पहिल्या वनडे सामन्यात भारताची गोलंदाजी उत्कृष्ट होती. अंशुल कंबोजने आपल्या 10 ओव्हर केवळ 22 धावा देऊन 2 विकेट मिळवले, ज्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच एक विकेट मिळवून न्यूझीलंडला धक्का दिला. मात्र तो या सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाजही ठरला. तर फलंदाजीत विराट कोहलीने अर्धशतक झळकावले, तर शुभमन गिलने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली.

भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, आकिब नबी, अंशुल कंबोज, गुरनूर बरार.

न्यूझीलंड संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेवोन कॉनवे, डेरिल मिशेल, हेनरी निकोल्स, जॅकब डफी, मैट हेनरी, विल यंग, माइकल ब्रेसवेल, काइल जेमीसन, टिम सीफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, ब्लेयर टिकनर, नेथन स्मिथ, मॅथ्यू फिशर.

हेही वाचा : दिल्लीच्या वायुप्रदूषणा समोर BCCI ही नमलं, भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्याचं ठिकाण बदललं

दुसरा वनडे सामना कधी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वनडे शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावर्षी दिवाळी रविवारी 8 नोव्हेंबर रोजी आहे. त्यापूर्वी हा सामना खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे वेलिंग्टनच्या वेलिंग्टन रीजनल स्टेडियमवर खेळवला जाईल.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता या सामन्याचा टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि वेबसाईट तसेच अँपवर सोनी लिव्ह अँपवर पाहता येईल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Team india
Cricket News