• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पायल झांबरेंच्या परिवाराला एकनाथ शिंदेंचा फोन, काय दिलं आश्वासन? 'या प्रकरणात मी स्वतः...'

पायल झांबरेंच्या परिवाराला एकनाथ शिंदेंचा फोन, काय दिलं आश्वासन? 'या प्रकरणात मी स्वतः...'

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिच्या आईशी फोनवर संवाद साधलाय. फास्टट्रॅकवर खटला चालवण्यासह कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 07:35 PM IST|Updated: Nov 05, 2026, 08:09 PM IST
joinshare
पायल झांबरेंच्या परिवाराला एकनाथ शिंदेंचा फोन, काय दिलं आश्वासन? 'या प्रकरणात मी स्वतः...'
Image Credit: डीसीएम एकनाथ शिंदे

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पायल झांबरेंच्या परिवाराला एकनाथ शिंदेंचा फोन, काय दिलं आश्वासन? 'या प्रकरणात मी स्वतः...'

पायल झांबरेंच्या परिवाराला एकनाथ शिंदेंचा फोन, काय दिलं आश्वासन? 'या प्रकरणात मी स्वतः...'

2

दिल्लीच्या वायुप्रदूषणा समोर BCCI ही नमलं, भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्याचं ठिकाण बदललं

3

लग्नातील जेवणासाठी FDAची परवानगी आवश्यक, नियमावर काय म्हणाले तुकाराम मुंढे?

4

धनश्री प्रेग्नेंट असताना चहलने फसवलं? आरजे महवशच्या व्हायरल व्हिडिओचं दाव्यांमागचं खरं काय?

5

भाजपच्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा? हायकोर्टाकडून याचिकाच रद्द; काय घडलंय नेमकं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायलच्या आईशी फोनवरून संवाद साधला आहे. या कठीण प्रसंगी सरकार तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी पायलच्या आईला दिला. या प्रकरणात सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

काय नेमकं प्रकरण?

पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमध्ये 2 नोव्हेंबर रोजी 34 वर्षीय पायल झांबरेचा मृतदेह आढळला. पायलने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून पैसे आणि सोन्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. मृत्यूपूर्वी भावाला पाठवलेल्या मेसेजमध्ये पायलने सासूचा उल्लेख केलाय. या प्रकरणात पती अक्षय झांबरे याला आधी अटक करण्यात आली. त्यानंतर सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांनाही पोलिसांनी अटक केली. तिघांनाही 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नणंद अक्षता झांबरे-निमन हिच्याविरोधातही गुन्हा दाखल आहे.


एकनाथ शिंदेंचा फोन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायलच्या आईशी फोनवर संवाद साधून सरकार कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्यासाठी प्रयत्न करू आणि दोषींना सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

‘प्रकरण फास्टट्रॅकवर चालवणार’

पायलला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शिंदे यांनी कुटुंबीयांना सांगितले. तसेच या प्रकरणात आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने व्हावी, अशी अपेक्षा पायलच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधितांना कठोर संदेश दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले.


सुनावणीत काय झालं?

भाकरी नीट केली नाही या कारणावरुन सासू - सुन दोघांमध्ये वाद झाला. यानंतर पायलने आत्महत्या केली असे पायलचे वकील पुष्कर पाटील यांनी सांगितले. यावर आरोपीच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. श्रीमंत लोक असं करत नाहीत, असे ते म्हणाले. यानंतर श्रीमंत आहेत म्हणून अशा कृत्याचा त्यांच्याकडे परवाना नाहीय. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन तपास होणे गरजेचे असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Pune
Pune News