भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये लढत पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. टीम इंडियाचा आज पाकिस्तानविरुद्ध फुटबॅाल सामना खेळवण्यात आला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने आणखी एकदा दमदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-2 ने भारताने पराभूत करुन सॅफ चॅम्पियनशिप 2026 च्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. बांगलादेशातील ढाका नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि पहिल्याच हाफमध्ये 3 गोल केले. या सामन्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने दमदार पुनरागमन केले, ते भारताला जिंकण्यापासून रोखू शकले नाहीत. भारताच्या या विजयाचा हिरो सुहेल भट्ट होता, ज्याने सामन्यात 2 गोल केले. या सामन्यामध्ये किपगेननेही गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानविरुद्धच्या या प्रभावी विजयामुळे भारतीय संघाने 'ब' गटात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या गटात भारत, पाकिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. तर, 'अ' गटात यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान यांचा समावेश आहे.
हे ही वाचा
तीन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर, पाकिस्तान संघ दुसऱ्या हाफमध्ये पूर्णपणे कायापालट करून मैदानात उतरला. सामन्याच्या नियमित वेळेतील संपूर्ण 90 मिनिटे भारतीय बचावफळीने पाकिस्तानला रोखून धरले होते आणि भारतीय फॉरवर्ड्सना आपली आघाडी वाढवता आली नाही, तरीही खरा थरार स्टॉपेज टाइममध्ये (इंज्युरी टाइम) घडला. जेव्हा असे वाटत होते की भारत हा सामना 3-0 ने सहज जिंकेल, तेव्हा 91 व्या मिनिटाला नजीबुल्लाहने पाकिस्तानचा पहिला गोल केला.
या गोलमुळे पाकिस्तानी खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आणि त्यांनी भारतीय गोलपोस्टवर अथक दबाव आणायला सुरुवात केली. अवघ्या तीन मिनिटांनंतर, 94 व्या मिनिटाला, आलमगीर काझीने आणखी एक गोल करून स्कोअर 3-2 असा केला. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये भारत पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात होता, पण अखेरीस, पंचांच्या अंतिम शिट्टीने सुटकेचा निःश्वास सोडला आणि भारताने 3-2 असा रोमांचक विजय थोडक्यात टाळला.