भारताचा टी20 विश्वचषक विजेता माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर आता तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. गेल्या महिन्यात रणजी संघातून वगळल्यानंतर, सूर्या आता व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये आपले नेतृत्व कौशल्य दाखवेल.
1/8
मुंबईकडून एक मोठा निर्णय
मुंबईकडून हा एक मोठा निर्णय आहे, कारण काही काळापूर्वी त्याला रणजी ट्रॉफीसाठी संघात स्थान दिले नव्हते, तर आता त्याला थेट कर्णधारपद दिले जात आहे. 36 वर्षीय सूर्यकुमार यादव शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2026 च्या टी20 विश्वचषकात खेळला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
7 आणि 9 नोव्हेंबर रोजी सराव सामने
संघ निवडीपूर्वी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी 7 आणि 9 नोव्हेंबर रोजी सराव सामने खेळले जातील. मुंबई संघाची निवड 9 नोव्हेंबर रोजीच केली जाईल, तर खेळाडू 11 नोव्हेंबरला कोलकातासाठी रवाना होतील." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
व्हाईट-बॉल स्पर्धांसाठी सूर्यकुमार कर्णधार
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने सांगितले, "वरिष्ठ निवड समितीने या हंगामातील दोन्ही व्हाईट-बॉल स्पर्धांसाठी सूर्यकुमारला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
निवड समितीने असा युक्तिवाद केला होता की, सूर्यकुमार अलीकडे पुरेसे लाल चेंडूचे क्रिकेट खेळलेला नाही. आता, त्याचे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन आणि कर्णधारपदामुळे परिस्थिती बदलली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
देशांतर्गत हंगामासाठी उपलब्धता
जेव्हा गेल्याच महिन्यात त्याला मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून वगळण्यात आले होते. त्याने संपूर्ण देशांतर्गत हंगामासाठी आपली उपलब्धता जाहीर केली होती, परंतु निवड समितीने त्याचा लाल चेंडूच्या संघात समावेश केला नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
सूर्यकुमारची नियुक्ती
टाइम्स ऑफ इंडियाच्या (TOI) वृत्तानुसार, सूर्यकुमार या मोसमात दोन्ही व्हाईट-बॉल स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे, सूर्यकुमारची नियुक्ती अशा वेळी झाली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निर्णय
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
मुंबई संघाचे नेतृत्व करणार सूर्यकुमार
भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, सूर्यकुमार यादव आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले कर्णधारपद दाखवणार आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद गमावल्यानंतर आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया