• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झालाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केलीय. सोबत 22 हजारांची उचलही मिळणार आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 04:00 PM IST|Updated: Nov 05, 2026, 04:11 PM IST
joinshare
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा
Image Credit: एसटी महामंडळ बोनस

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

2

प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर

3

आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

4

'तेव्हाच 24 तासांची वेळ सुरु होते, अन्यथा...,' पोलिसांच्या अटकेच्या कारवाईसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कायद्यातील हा नियम लक्षात ठेवा

5

‘हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर...’, 'रूम नंबर सांगू का?', '9 तारखेला सकाळी...' सतेज पाटील सगळंच बोलले; 'अमूल'चाही उल्लेख

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केलाय. याशिवाय कर्मचाऱ्यांना 22 हजार रुपयांची उचल घेण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणारय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजारांचा दिवाळी बोनस

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला 10 हजार रुपये बोनस म्हणून दिले जाणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली. यापूर्वी कर्मचारी संघटनांनी वाढती महागाई आणि इतर सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी भेटीचा दाखला देत 15 ते 20 हजार रुपयांच्या बोनसची मागणी केली होती. आता सरकारने 10 हजार रुपयांचा निर्णय जाहीर केलाय.

बोनससोबत 22 हजारांची उचल

बोनसव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना 22 हजार रुपयांची उचल घेण्याची सुविधाही मिळणार आहे. या दोन्ही रकमा वेगवेगळ्या आहेत. बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मिळणार आहे, तर उचल म्हणून घेतलेले पैसे नंतर त्यांच्या पगारातून वळते केले जातील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या रकमेचा विचार करताना बोनस आणि परतफेड करावी लागणारी उचल यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

महामंडळावर 105 कोटींचा आर्थिक भार

या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे 105 कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे. उचल वितरणासाठी महामंडळाला दरमहा सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याचे प्रताप सरनाईकांनी सांगितले. महामंडळाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा खर्च कसा भागवला जाणार, याकडे लक्ष असेल. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि महामंडळ प्रयत्नशील असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

इतर मागण्यांवर दिवाळीनंतर तोडगा काढणार

बैठकीत वेतन, भत्ते, चालक भरती आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. उर्वरित मागण्यांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्याचे आश्वासन सरनाईक यांनी दिले. चालकांची कायमस्वरूपी भरती करण्याचा प्रस्ताव यापूर्वी शासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र तो मंजूर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तात्पुरत्या स्वरूपात चालकांची भरती केली जात आहे. कायमस्वरूपी भरतीसाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार असून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही स्वतंत्र बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

संपाऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांनी वारंवार संपाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन सरनाईक यांनी केले. प्रवाशांना वेठीस धरले जाणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारले जाण्याच्या तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News