"गोकुळ केंद्रबिंदू म्हणून कायदा सरकारकडून काढण्यात आला. सहकारी ज्यावेळी होते त्यावेळी फक्त फेडरल इन्स्टिट्यूट गोकुळ आणि दोन संस्थांना लागू होणार आहे. यांना गोकुळमध्ये सत्ता मिळवायची आहे. जनतेने दिलेला कौल नाकारायचे काम सरकार करत आहे," असं काँग्रसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी बुधवारी सरकारने 4 अतिरिक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.
जबरदस्ती कायदा बदलणे चुकीचं
"कालचा दिवस हा इतिहासातला काळ दिवस मानला जाणार आहे. बहुमत स्वतःकडे वाळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 5.5 लाख शेतकऱ्यांचा संसार यावर आहे. दररोज 20 लाख लिटर दूध गोळा होते. शेतकऱ्यांचे कौल सरकारला मान्य नाही. राहुल गांधींनी आमच्या बाजूने ट्विट केलं. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि कायदा बदलण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेटमध्ये एकही शब्द बोलले नाहीत. कायदा का आणतोय याचे काय परिणाम होणार आहेत? निवडणुकीच्या आधी हा कायदा झाला असता तर समजू शकतो. आता निवडणूक झाली, मतदान झाले, निकाल लागल्यानंतर कायदा आणला. निकाल तुमच्या बाजूने निकाल लागा नाही म्हणून कायदा बदलायचा. सत्ता मिळवायची आहे म्हणून जबरदस्ती कायदा बदलणे चुकीचं आहे," असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
त्यांचा रूम नंबर सांगू का?
हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात बोलताना, "दोस्त ने दोस्तीत गद्दारी केली आहे," असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे. "ज्यांना जनतेने नाकारला ते तज्ज्ञ कसे होऊ शकतात? हे आम्हाला माहिती नाही. 12 जाण गोव्याला गेल्यानंतर सुरत आणि आता उदयपूरमध्ये आहेत. त्यांचा रूम नंबर सांगू का? आता कुठे आहेत ते आम्हाला माहित आहे," असं सतेज पाटलांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं.
तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही
आम्ही कोर्टात जाणार आहोत. हायकोर्टात सात दिवसांची नोटीस काढावी लागेल. आमची कायदेशीर लढाई सुरू राहणार आहे. सगळे उदयपूरला आहेत आम्हाला 13 चे बहुमत मिळेल. सत्तेत येईसाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बहुमत मिळालं आहे. कोर्टात निर्णय होईल आम्हाला विश्वास आहे. जनतेने नाकारले आणि कोर्टात निर्णय येणार नाही हे समजले म्हणून त्यांनी कायदा बदलायचा प्रकार केला. तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही, तुम्हाला सत्तेत बसायचे हा तुमचा एकमेव मुद्दा आहे. फक्त गोकुळसाठी हा कायदा का लागू होत आहे," असं सतेज पाटील म्हणाले.
'अमूल'चा उल्लेख
"वोट चोरीवर आवाज उचलला. आता सत्ता चोरी यांच्याकडून सुरू झाली आहे. मी येताना गोकुळचे दही, गुलाबजाम आणणार होतो. कारण कदाचित उद्यापासून सगळीकडे 'अमूल'चे स्टिकर लागतील की काय असा प्रश्न आहे," असं सूचक विधान सतेज पाटलांनी केलं.
अदृशशक्तीने त्यांनी काय काय केले ते तुम्ही...
"कायद्यावर विश्वास आहे तर गव्हर्नरची सही घेऊन शासन आदेश काढायला पाहिजे होता. उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळे घेऊन जाणार आहे. माझ्याकडून कोणताही प्रकार घडणार नाही. अदृशशक्तीने त्यांनी काय काय केले ते तुम्ही बघितलं असेल. लोकांनी रस्त्यावर उतरावे लागेल कारण हे प्रकार कोणासोबत ही होऊ शकतो. आमची सत्ता आली नाही म्हणून कायदा बदलू. सुरुवात गोकुळपासून आहे, ती एसआरएपर्यंत जाणार. कोल्हापूरकरांचा अपमान सरकारने केला आहे. मतदानातून संदेश दिला आहे तरी ते अपमान करत आहेत," असं सतेज पाटील म्हणाले.
वोट चोरीसारखं आता सरकार चोरी
"कोल्हापूर सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या विरोधात असे कायदा काढतात. आम्ही रणनीती तयार केली आहे. परंतु आता सांगणार नाही. लोकांचे फोन येत आहेत. ते म्हणतात वोट चोरीसारखं आता सरकार चोरी झाली आहे. तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. कायदा जेव्हा वगळता तेव्हा अॅड करायची प्रक्रिया पण असणार नाही. कोल्हापूरकरांचा विरोधात सरकारने डाव चालवला आहे. कोल्हापूरकरांचा अपमान सरकारने केला आहे. 90 टक्के सरकारच्या नेत्यांशी संपर्क केले आहेत," असं सतेज पाटील म्हणाले.
हा अपमान फक्त बंटी पाटीलचा नाही तर...
"9 तारखेला (9 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता दसरा चौक येथून कोल्हापूर संघर्ष मोर्चा जिल्हाकार्यालयपर्यंत काढणार आहोत. हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर कोल्हापूरकरांचा अपमान आहे. मोठ्या संख्येने या मोर्च्यात कोल्हापूरकर सहभागी होतील," असंही सतेज पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा फोन
सतेज पाटलांची ही पत्रकार परिषद झाल्यावर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला. गोकुळबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तुमच्यासोबत असल्याचं आश्वासन ठाकरेंनी सतेज पाटलांना दिलं. या लढ्यात शिवसेना सतेज पाटील यांच्यासोबत असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.