Cristiano Ronaldo Retirement : पोर्तुगालचा कर्णधार आणि महान फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने 5 नोव्हेंबर गुरुवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली जाहीर केली आहे. काहीच अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली. आता रोनाल्डोने सुद्धा हा मोठा निर्णय घेतला आहे. आता रोनाल्डोनेही हा मोठा निर्णय घेतला असून त्याद्वारे त्याच्या कारकिर्दीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा जागतिक विक्रम आणि तीन विजेतेपदे आपल्या नावावर केलेल्या रोनाल्डोने आपल्या कारकीर्दला पूर्णविराम लावला.
41 वर्षांच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरुवारी 5 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितलं. पोर्तुगालच्या चाहत्यांना उद्देशून रोनाल्डो म्हणाला, 'पोर्तुगालच्या लोकांनो, आता राष्ट्रीय संघात ७ क्रमांकाची जर्सी परत करण्याची वेळ आली आहे. मी कधीही असे मानले नाही की ही जर्सी फक्त माझी आहे; मात्र गेल्या 23 वर्षांपासून ती परिधान करण्याचा, तिचे रक्षण करण्याचा आणि मैदानात ती सोबत नेण्याचा मान मला मिळाला. आज, ती जर्सी पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे'.