WPL 2027 Mumbai Indians : बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या शेड्युलची घोषणा केली आहे. महिला प्रीमियर लीग 2027 च्या 14 जानेवारी पासून ते 7 फेब्रुवारी 2027 पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा वडोदरा आणि मुंबई या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली असून सुरुवातीचे 11 सामने हे वडोदरा येथे तर नंतरचे 11 सामने हे मुंबईत होतील. स्पर्धेचा पहिला सामना वडोदरा येथे खेळवला जाईल ज्याची सुरुवात ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मुंबईत होणारे सामने हे ब्रेबॉन स्टेडियमवर होतील तर वडोदरा येथे होणारे सामने हे वडोदरा स्टेडियमवर खेळवले जातील. तेव्हा महिला प्रीमियर लीगमधील सर्वात प्रसिद्ध आणि दोनदा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या सामन्यांचं वेळापत्रक कसं असणार आहे याविषयी जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सच्या सामान्यांचं शेड्युल :
गुरुवार, 14 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स , ठिकाण : वडोदरा
रविवार, 17 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स , ठिकाण : वडोदरा
बुधवार, 20 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स , ठिकाण : वडोदरा
शनिवार, 23 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स , ठिकाण : वडोदरा
मंगलवार, 26 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु, ठिकाण : मुंबई
गुरुवार, 28 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, ठिकाण : मुंबई
शनिवार, 30 जानेवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, ठिकाण : मुंबई
सोमवार, 1 फेब्रुवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ठिकाण : मुंबई
एलिमिनेटर, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता, ठिकाण : मुंबई
फायनल, रविवार, 7 फेब्रुवारी 2027, संध्याकाळी 7:30 वाजता, ठिकाण : मुंबई
WPL 2027 साठी मुंबई इंडियन्सचा संघ :
अमनजोत कौर, अमेलिया केर, हरमनप्रीत कौर, हेले मॅथ्यूज, नताली साइवर ब्रंट, निकोला कैरी, राहिला फिरदौस, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, शबनीम इस्माइल, वैष्णवी शर्मा, सानिका चालके, श्वेता सहरावत, अक्षिता भगत.