• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...

तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...

कुणाच्या पोटात सेफ्टी पिन तर कुणाच्या पोटात शिक्के गिळल्याचे तुम्ही एकले असेलच. पण कोणी टुथब्रश गिळल्याचे तुम्ही ऐकलंय का?

Written ByMansi Kshirsagar
Published: Sep 29, 2026, 02:57 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:09 PM IST
joinshare
तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...
Image Credit: तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ऐकावे ते नवलच असा काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये पुढे आला आहे. एका व्यक्तीने ब्रश करताना थेट टूथ ब्रश गिळल्याचे समोर आले आहे.  ब्रश करताना त्याला ठसका आला आणि चुकून हा ब्रश घशातून थेट पोटातच गेला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. आता रुग्ण ठणठणीत आहे. मात्र अत्यंत दुर्मिळ अशी ही घटना छत्रपती संभाजी नगर मध्ये उघडकीस आली आहे. पाहुयात काय आहे हा प्रकार?

रोज सकाळी दात स्वच्छ करण्यासाठी हातात असणारा ब्रश थेट कधी पोटातही जाईल याची कोणीच कल्पना करु शकत नाही. पण संभाजीनगरमध्ये अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुणाला तंबाखू खाण्याचे व्यसन होते. त्यामुळं त्याचे दात खराब झाले होते. डॉक्टरांनी मागचे दात स्वच्छ ठेवण्यास सांगितले होते.

तरुण दात घासत असताना त्याला जोराचा ठसका लागला आणि ब्रश थेट त्याच्या घशात गेला. इतकंच नव्हे तर घशातून ब्रश त्याच्या पोटात गेला. ब्रश पोटात गेल्यावर रुग्ण घाबरला. आता पोटातून ब्रश कसा काढायचा हे ही कळेना. अखेर रात्री गावातून तो शहरात पोहोचला आणि रुग्णालयात दाखल झाला.

पोट विकार तज्ज्ञ डॉ चेतन राठी यांनी शर्थीचे प्रयत्न करत इंडोस्कोपी करत अवघ्या 10 मिनिटांत ब्रश ओढून बाहेर काढला. इथे नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला आहे. तर डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे अवाहन केलं आहे.

ब्रश पोटात जाऊ शकतो असं कधीही वाटू शकतं  नाही मात्र संभाजीनगर मध्ये हे घडलंय. ही घटना दुर्मिळ आहे यातून रुग्णाचा जीवही जाऊ शकला असता मात्र चूक लक्षात आली योग्य उपचार मिळाले आणि अखेर रुग्णाचा जीव वाचला त्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Chhatrapati Sambhajinagar