SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! भाजपच्या महापौरांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, आमदाराने सांगितले धक्कादायक कारण

भाजपच्या महापौरांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. धुळ्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 22, 2026, 16:53 IST | Updated: Nov 22, 2026, 16:57 IST
Join

धुळे क्राईम :  महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजणारी घडाोड घडली आहे.  भाजप नेत्या तथा धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी  आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. आमदार अनुप अग्रवाल याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.ॉ

धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. मायादेवी यांनी  विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले. मायादेवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महापौर मायादेवी परदेशी यांच्याबद्दल निषेधार्य वक्तव्य करण्यात आले होते. यामुळे मयादेवी यांना  मानसिक धक्का बसला. यातूनच त्यांनी आत्महतयेचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे. गोरक्षक संजय शर्मा यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली.

संजय शर्मा यांनी मायादेवी यांच्याबाबत मानहाणीकारक वक्तव्य केले होते. शर्मा यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.  मात्र, मानहानी सहन न झाल्याने  महापौर यांनी उचलले टोकाचे पाऊले. मायादेवी यांनी विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.  महापौरांचे पती महादेव परदेशी यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.  त्यांच्यावर विघ्नहर्ता या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळे शहरामध्ये अवैध कत्तलखाने आणि विविध अवैध धंदे सुरु असून हे सर्वा तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी मायादेवी परदेशी यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, संजय शर्मा यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केला. यामुळे मायदेवी मानसिक तणावात होत्या. यातूनच त्यंनी टोकाचे पाऊस उचलले. भाजपने (BJP) संजय शर्मा यांच्या निषेधार्थ आज मोर्चा काढला होता. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES