SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रविवार ठरला घातवार! बीड आणि अमरावतीत झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

बीडमध्ये स्विफ्ट कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 18, 2026, 12:54 PM IST | Updated: Oct 18, 2026, 12:56 PM IST
Image Credit: अमरावती येथे झालेल्या अपघाताची छायाचित्र
Join

आजचा रविवारचा दिवस हा घातवाराचा दिवस ठरला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड येथे झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर अमरावतीतील अपघातात तीन जणांनी जीव गमावला आहे.

बीड येथे स्विफ्ट कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. माजलगाव तेलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी फाट्यावरील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट एसटीला जाऊन धडकली. कारची धडक इतकी भीषण होती की. अपघातातील कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर, एसटीतील सर्व प्रवासी मात्र सुखरूप आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील भाविक तुळजापूरला दर्शनासाठी जात होते. तेव्हाच कारचा अपघात झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश असल्याचंही समोर येतेय. तसंच, अपघातानंतर काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

अमरावतीत अपघात

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-अडगाव मार्गावर क्रेनने पायी चालणाऱ्या पाच मजूरांना धडक दिली. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी झाले आहेत. अडगावकडून यावली शहीदकडे पायी जात असताना हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, मागून आलेल्या हायड्रा क्रेनने पाच जणांना उडवले. मृतांमध्ये राजेश बायस्कर, दिनेश आणि मदारी यांचा समावेश आहे. जखमी पिंटू चव्हाण आणि राजू पानसे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सर्व मृत आणि जखमी मध्यप्रदेशातील बक्की चिखली येथील रहिवासी असून माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे.

नांदुरीत भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना धडक

नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसह भाविकांनाच भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास वणीच्या दिशेने येणाऱ्या सियाज कारने अभोणा वळण रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि सात भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या कारने यापूर्वीही इतर वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES