Maharashtra Breaking News Today LIVE : आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पुणे मेट्रो-3 मार्गिका उदघाटनाआधी पत्र
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 03 November 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 03 November 2026 : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता न्यायालयात युक्तिवाद करतील. पुणे मेट्रोच्या पिंक लाईनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. पुण्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींकडून 21,800 कोटींची मेगा भेट
03 Nov 2026, 11:41 AM
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पुणे मेट्रो-3 मार्गिका उदघाटनाआधी पत्र
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारण्यासह रस्ते, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
पुण्यातील हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आज होत आहे. मात्र, हिंजवडी परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य रश्मी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हिंजवडी-माण-मांजरी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि मुळा नदीचे वाढते प्रदूषण या गंभीर प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
03 Nov 2026, 10:46 AM
रोहित पाटलांना धक्का, माजी आमदार सुमनताई पाटीलांचा पराभव
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय झाला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत १ मताने संजय काका पाटलांचा विजय
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा झाला पराभव. संजयकाका पाटलांनी पडली 39 मते. माजी आमदार सुमनताई पाटील यांना पडली 38 मते. आमदार रोहित पाटीलांना मोठा धक्का.जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विजयामुळे अखेर संजयकाका पाटलांना लागला गुलाल.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कवठेमहंकाळमधून अजित घोरपडे विजयी..राष्ट्रवादी SPच्या टी व्ही पाटलांचा पराभव.. अजित घोरपडेंना मिळाली 37 मतं..
03 Nov 2026, 9:59 AM
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे विजयी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे विजयी... माण सोसायटी गटातून विजयी...जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा केला पराभव...जयकुमार गोरे यांना 53 मते तर त्यांचे बंधू शेखर गोरे 7 आणि राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 14 मते
03 Nov 2026, 9:58 AM
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक, पारनेरमधून निलेश लंके विजयी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, पारनेर सेवा सहकारी संस्था मतदार संघातून खासदार निलेश लंके विजयी. लंके यांना 104 पैकी 63 मते मिळाली
03 Nov 2026, 9:46 AM
रायगडाचा रोप-वे आजपासून पुन्हा सुरू
रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी दीड महिन्यांपासून बंद असलेली रायगड रोप-वे सेवा वेळेपूर्वीच पूर्ववत करण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्याने ही सेवा आजपासून पुन्हा सुरू झाली असून,दिवाळी हंगामात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
03 Nov 2026, 9:42 AM
अहिल्यानगर जिल्हा बँकेची मतमोजणी सुरु, विखे की निलेश लंके कोण मारणार बाजी?
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 10 जागांचा आज निकाल जाहीर होणार आहे... निवडणुकीत दहा जागेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून 99.27 टक्के मतदान झालं आहे... जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात पॅनलच्या 21 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता विखे-थोरात यांच्या सहकार पॅनल विरोधात निलेश लंके-सदाशिव लोखंडे यांच्या परिवर्तन पॅनलचा सामना झाला आहे
नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगावात शेतकऱ्याने आत्महत्या केलीयं.... नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन शेतक-याने जीवन संपवलं....... गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी , शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं..... ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातेयं.......
03 Nov 2026, 9:37 AM
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत 21 जागांसाठी 402 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत... छाननीच्या दिवशी वेगवेगळ्या उमेदवारांच्या अर्जावर 9 जणांच्या हरकती आल्यात... जिल्हा बँकेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय पवारांसह त्यांच्या पत्नीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आलीय... भाजपच्या मंत्री रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेच्या उमेदवारांनी हरकत घेतलीय... तर मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेच्या 3 उमेदवारांच्या अर्जावर भाजपच्या मंत्री रक्षा खडसेंनी हरकत घेतलीय... छाननीत वैध आणि बाद अर्जाच्या उमेदवारांची यादी आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार आहे...
03 Nov 2026, 9:36 AM
सांगली जिल्हा बँकेचा कौल कुणाला?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बँकेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी होणार असून, यामध्ये सर्वाधिक लक्ष जत सोसायटी गटाच्या निकालाकडे लागलंय.... या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांच्यात चुरशीची लढत झाली आहे...जत सोसायटी गटात अवघे 87 मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विजयासाठी 45 मतांचा आकडा गाठणे आवश्यक असल्याने दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. तर सातारा, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचाही आज फैसला होणार आहे, अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये लंके विरुद्ध विखे समर्थकांमध्ये सामना रंगला होता.. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय. तर साता-यातही जिल्हा बँकेचा निकाल लागणार आहे..
03 Nov 2026, 9:36 AM
गोकुळ अध्यक्ष निवडीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष निवडीचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलंय... एकतर्फी निर्णय घेऊ नये, म्हणून सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलीय... तर याआधी गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची सभा घ्या आणि 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया राबवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत... निवडणूक आयोगानं 7 दिवसाची नोटीस देऊन निवडणूक घ्यावी, असे आदेशच मुंबई हायकोर्टानं दिलेत... निवडून आलेले 25 संचालकांनाच अध्यक्ष पद निवडणुकीला उपस्थित राहता येईल, असं मुंबई हायकोर्ट म्हणालंय... तर आता सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीनं गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी कॅव्हेट दाखल केलीय...
03 Nov 2026, 9:35 AM
मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत राजकीय संघर्ष
मीरा भाईंदरमध्ये महायुतीत राजकीय संघर्ष पाहायाला मिळाला....शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपनं भाईंदर पूर्वेतील नवघर नाका येथे जनआंदोलन केलं... यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करत जमीन व्यवहार, विकासकामं आणि इतर कथित भ्रष्टाचारांवरून गंभीर आरोप केले... मात्र, हे आंदोलन सुरू असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दाखल होत भाजपला प्रत्युत्तर दिलं... इतरांवर आरोप करण्यापूर्वी भाजप नेत्यांनी स्वतःच्या कामाचा आरसा पाहावा, असा संदेश देत त्यांनी भाजप नेत्यांना प्रत्यक्ष आरसा दाखवला आणि निषेध नोंदवला....त्यामुळे या आंदोलनादरम्यान भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला...
03 Nov 2026, 9:33 AM
क्लस्टरवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना दणका
नवी मुंबईच्या क्लस्टर योजनेवरून वनमंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा दणका दिलाय. मनपाच्या निर्णयाला डावलून नगरविकास खात्याने क्लस्टरला मंजुरी दिली होती. मात्र हा निर्णय महासभेने नाकारलाय. हा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी रोखठोक भूमिका सभागृह नेते सागर नाईक यांनी घेतली. तर शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील यांनीही क्लस्टरविरोधात भूमिका घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
03 Nov 2026, 9:33 AM
इम्रान खानचा कोर्टात माफीनामा
SIR विरोधी आंदोलनात सहभागी इम्रान खानचा कोर्टात माफीनामा…कृत्याची पुनरावृत्ती होणार नसल्याचं हमीपत्र…अमेरिकन पासपोर्टवर देशात वास्तव्याला असताना नियमांचं उल्लंघन केल्यानं कोर्टाने फटकारल्यानंतर माफी….
03 Nov 2026, 9:31 AM
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांच्या निवडणूकीचा आज फैसला
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांच्या निवडणूकीचा आज फैसला.. गोपीचंद पडळकरांकडे सा-यांच्या नजरा, सातारा, अहिल्यानगर जिल्हा बँकेचा कौल कुणाला याचीही उत्सुकता..
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे. गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या. मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.