Maharashtra breaking news : शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात झाली आहे. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरु असलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर पाहायला मिळतील. अतिक्रमण धारकांच्या मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी महापालिकेला हवी होती एक महिन्याची मुदतवाढ, मराठी कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करायचे असल्याचे महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण. ब्लॅागच्या लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.
04 Nov 2026, 4:44 PM
पूर्व गोदावरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; गोपालपुरममध्ये पूरस्थिती
पूर्व गोदावरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोपालपुरम परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वस्तीच्या भागांसह व्यावसायिक आस्थापनांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने काही नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतांवर आश्रय घेतला आहे. पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
04 Nov 2026, 4:10 PM
आदित्य ठाकरे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आदित्य ठाकरे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.. ठाकरे यांचा दुष्काळ पाहणी दौरा.. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन.. नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन.. ठाकरे सेनेच्या माध्यमातून पंचनामे, दुष्काळ मदत, पिक विमा याबाबत केला जाणार पाठपुरावा.. आदित्य ठाकरे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद.. शेतकऱ्यांनी मांडल्या ठाकरेंसमोर व्यथा.. आदित्य ठाकरे यांच्या सोबत अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सुनील शिंदे आणि उदयन गडाख..
04 Nov 2026, 4:05 PM
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिया मिर्झा व्हिडीओ प्रकरणावरुन वातावरण तापले
दिया मिर्झा व्हिडीओ प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधक आमने सामने आले आहेत. प्रदूषण या विषयावर बोलत असताना कॉग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी दिया मिर्झा यांचा विषय काढला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी ट्विट केले असे सांगतच भाजप नगरसेवक आक्रमक झाले, विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आणि भारत माता की जयच्या भाजप नगरसेवकांकडून घोषणाबाजी सुरु झाली.
04 Nov 2026, 4:01 PM
BMC आयुक्तांविरोधातील अवमानना प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका
BMC आयुक्तांविरोधातील अवमानना प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका घेतली आहे. कोर्टाच्या कडक भूमिकेनंतर BMC आयुक्तांकडून आदेशाचे पालन. सर्व बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमित संरचना हटवल्याची आयुक्तांच्या वकिलांची सुप्रीम कोर्टात माहिती. आयुक्तांचा पगार रोखण्याचा इशारा दिल्यानंतर एका दिवसात पालिकेची कारवाई. आयुक्तांच्या वकिलांनी अधिकाऱ्यांचा बचाव केल्याबद्दल कोर्टाची वैयक्तिक माफी मागितली. आज किंवा उद्यापर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचे प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची कोर्टाला दिली माहिती.
04 Nov 2026, 3:49 PM
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
वाहनांवरील दंडासाठी अभय योजना नियमभंग केलेल्या वाहनावरील दंडासाठी महाराष्ट्र वाहतुक पोलीस चलान अभय योजना-२०२६ चलनावरील प्रलंबित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार वाहन धारकांना थकबाकी भरून वाहन दंडमुक्त करता येणार
04 Nov 2026, 3:15 PM
शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली
शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली, दिवाळीनंतर पुढील सुनावणी होणार.
04 Nov 2026, 3:10 PM
ध्रुव मेहता यांनी विविध प्रकरणांचा दाखल देत आहेत
ध्रुव मेहता मार्टिन जी. विश्वनाथन मल्लोत यांच्याशी संबंधित निकालाचा संदर्भ देण्यात आला, निकालातील परिच्छेद क्रमांक ७ आणि पान क्रमांक २३५ चा उल्लेख.
हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले होते
खंडपीठाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.
२०१६ मध्ये यासंदर्भात आदेश पारित करण्यात आला होता.
याचिकाकर्ते त्या वेळी राज्यसभेचे सदस्य होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला आहे.
सद्यस्थिती लक्षात घेता, संबंधित कायदेशीर मुद्द्यांवर निर्णय देणे उचित ठरणार नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते असे ध्रुव मेहता म्हणाले
04 Nov 2026, 2:58 PM
ध्रुव मेहता यांच्याकडून राणा केसचा उल्लेख
ध्रुव मेहता यांच्याकडून राणा केसचा उल्लेख व्हिप नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाचा - मेहता आयोगाने पुराव्याच्या आधारे निर्णय दिला - मेहता आयोगाचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय स्वतंत्र वकील ध्रुव मेहता यांनी युक्तीवादावेळी काही इतर प्रकरणांचा उल्लेख केला.
04 Nov 2026, 2:54 PM
शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सव्वा तीन वाजेपर्यंत ध्रुव मेहता युक्तिवाद करणार
सव्वा तीन वाजेपर्यंत ध्रुव मेहता युक्तिवाद करणार सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ध्रुव मेहता यांना सव्वा तीन वाजेपर्यंत युक्तिवाद करण्यास सांगितले उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार नसल्याचे देखील सुरुवातीलाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले
04 Nov 2026, 2:52 PM
शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात
शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता यांनी युक्तिवाद केला सुरू आमदार अपात्रता संबंधी युक्तिवाद केला सुरू
शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.