सोशल मिडियावर पाकिस्तानी अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी लोकप्रिय फॅशन आणि लाइफस्टाइल मॉडेल इस्रा आयेशा हे पाकिस्तान मनोरंजन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सध्या ती 'तमाशा सीझन 5' या रिॲलिटी शोमुळे चर्चेत पाहायला मिळाली होती. अभिनेत्रीने या एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे, तिच्या पतीवर अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, नक्की अभिनेत्रीसोबत घडले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेला 'तमाशा सीझन 5' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेली इस्रा आयेशाने ऑक्टोबर 2026 मध्ये 'तमाशा'मधील सह-स्पर्धक, झेब खानसोबत लग्न केले. फॅशन आणि लाइफस्टाइल मॉडेल इस्रा आयेशाने नुकतीच एक मुलाखती दिली होती यामध्ये तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. इस्रा आयेशाने सांगितले की, जेव्हा तिचे झेबशी लग्न केले, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे 50 तोळे सोने आणि एका घराची मागणी केली होती. पण तिने पैशांपेक्षा प्रेम आणि शांततेला प्राधान्य दिले असे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
हे ही वाचा
इस्रा पुढे म्हणाली, "मला वाटतं, जेव्हा तुम्ही भविष्यात तुमच्या जोडीदारापासून वेगळे होण्याच्या शक्यतेचा विचार करता आणि नकारात्मकतेला तुमच्या मनावर हावी होऊ देता, तेव्हा तेच विचार तुमच्या मनात सतत घोळत राहतात. म्हणून मी ठरवलं की मला काहीही नको आहे, कारण त्यामुळे मला शांती मिळणार नव्हती."
चाहते इस्राच्या निर्णयाचे आणि शहाणपणाचे कौतुक करत आहेत. पाकिस्तानमधील जनता त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करत आहे. इस्राने झेब खानसोबत प्रेमविवाह केला होता. अभिनेत्रीने असेही सांगितले की, माझ्या मावशीने मला सांगितले की, लग्नात सर्व पुरुषांना बसवावे, वडीलधाऱ्या लोकांना बसवावे आणि मेहर (इस्लाममध्ये लग्नाच्या वेळी वर वधूला देतो तो पैसा किंवा दागिने) म्हणून ५० तोळे सोने आणि एक घर लिहून ठेवावे, कारण भविष्यात काहीही होऊ शकते."