• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /38 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल फिटनेस, डाइव्ह मारून पकडला कॅच, प्रेक्षक पाहतच राहिले

38 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल फिटनेस, डाइव्ह मारून पकडला कॅच, प्रेक्षक पाहतच राहिले

Virat Kohli Catch IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना बुधवारी खेळवण्यात आला. या सामन्यात 38 वर्षांच्या विराट कोहलीने नॅथन स्मिथचा कमाल कॅच पकडला. मात्र यावेळी या कॅचसाठी डाइव्ह मारणाऱ्या विराटची फिटनेस पाहून प्रेक्षक थक्क झाले.

Reported Bypooja pawar
Published: Nov 04, 2026, 05:11 PM IST|Updated: Nov 04, 2026, 05:48 PM IST
joinshare
38 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल फिटनेस, डाइव्ह मारून पकडला कॅच, प्रेक्षक पाहतच राहिले
Image Credit: 38 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल फिटनेस, डाइव्ह मारून पकडला कॅच, प्रेक्षक पाहतच राहिले

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
लग्न कसं टिकवून ठेवावं? कॉलेजचा तरुणांसाठी कोर्स;सुखी संसाराचे शिकवणार धडे!

लग्न कसं टिकवून ठेवावं? कॉलेजचा तरुणांसाठी कोर्स;सुखी संसाराचे शिकवणार धडे!

2

टीम इंडियात काम करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी निघाली भरती, तुम्हीही करू शकता अर्ज

3

BMC आयुक्त अश्विनी भिडेंचा पगार रोखण्याचा इशारा दिल्यानंतर एका दिवसात पालिकेची कारवाई

4

Multibagger Stock शोधणं आता सोपं! AI च्या उत्तराने गुंतवणूकदारही थक्क

5

38 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल फिटनेस, डाइव्ह मारून पकडला कॅच, प्रेक्षक पाहतच राहिले

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Virat Kohli Catch IND VS NZ : 38 व्या वर्षांचा विराट कोहली हा अनेकांसाठी फिटनेस आयकॉन आहे. या फिटनेसमुळे क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीचा चपळपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. न्यूझीलंड विरुद्ध फुल स्ट्रेच डाइव्ह मारून विराट कोहलीने अप्रतिम कॅच पकडला. 38 व्या वर्षी विराटने कॅच पकडण्यासाठी मैदानात मारलेली ही डाइव्ह पाहून सर्वच थक्क झाले.

कॅच घेतल्यावर विराट कोहलीचं सेलिब्रेशन व्हायरल :

न्यूझीलंड विरुद्ध ईडन गार्डनमध्ये खेळवला जाणाऱ्या पहिल्या वनडेमध्ये जगाने 28.3 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीची कमाल पाहिली. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर एक फुल आऊटस्विंगर बॉल टाकला. नॅथन स्मिथने त्यावर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. परंतु बॉल बॅटच्या बाहेरील कडेला लागून हवेत उडाला आणि फिल्डरच्या उजव्या बाजूला खाली येऊ लागला. अशावेळी विराट कोहलीने पूर्ण ताकदीनिशी उजव्या बाजूला झेप घेत एक अतिशय उत्कृष्ट, जमिनीलगतचा कॅच घेतला. तिसऱ्या अंपायरने तपासणी करून तो एक अचूक कॅच असल्याचे निश्चित केले. यासह न्यूझीलंडची धावसंख्या 115/7 अशी झाली. कॅच घेतल्यानंतर विराटने बाण मारल्याची ऍक्शन करून विकेटचं  सेलिब्रेशन केलं.

रोहित शर्माने डेरिल मिचेलला केलं रनआउट  :

विराट आधी रोहित शर्मा यानेही उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रदर्शन करत फलंदाजाला रनआउट केले. 21.1  व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने बॉल लेग साइडच्या दिशेने वळवला आणि धाव घेण्यासाठी सुरुवात केली. मात्र शॉर्ट मिड-विकेटवर तैनात असलेला रोहित शर्मा अत्यंत सतर्क होता. रोहित शर्मा ने ऑन साइडच्या दिशेने जात असताना बॉल पकडला आणि हवेत उडी मारत तो विकेटकिपरकडे सोपवला. केएल राहुलने बेल्स उडवून ही कामगिरी पूर्ण केली. दरम्यान, दोन्ही फलंदाजांमधील ताळमेळाचा अभावही स्पष्टपणे दिसून आला. 97 धावांवर न्यूझीलंडची पाचवी विकेट पडली. डॅरिल मिचेल 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

It's the King's birthday weekend, and we get the presents!  Watch the HERO VIDA India Tour of New Zealand 1st ODI, LIVE NOW on Sony Sports Network TV channels, Sony LIV & Sony Vizha. #SonySportsNetwork SonyLIV SonyVizha NZvIND | [Virat Kohli] https://t.co/LffbctfFwm

Sony Sports Network (SonySportsNetwk) November 4, 2026

VIRAT KOHLI IS BACK WITH HIS ICONIC DHANUSH CELEBRATION! Finally, our day is made! The GOAT has brought back his iconic celebration for us! https://t.co/sayD7M3Ahh

 Sam (cricsam02) November 4, 2026

हेही वाचा : W, W, W, W... न्यूझीलंडमध्ये अर्शदीप सिंगची खळबळ! गर्लफ्रेंडसाठी केले खास सेलिब्रेशन

 

भारताने जिंकला पहिला सामना :

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या वनडे सीरिजचा पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारताच्या संघाने डीएलएस पद्धतीने या सामन्यामध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Virat Kohli
Marathi News
Cricket News
Team india