Maharashtra Breaking News Today LIVE Updates 30 october 2026 : ऊस दरासंदर्भात कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेली दुसरी बैठक देखील निष्फळ. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेले बैठक कोणत्याही तोडग्याविना बैठक संपली. जगात काहीतरी मोठं घडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या मागील कारण म्हणजे जगातील 15 हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना आपत्कालीन स्थितीसाठी तयार राहा अशा सूचना केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणारे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे उबाठाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.
30 Oct 2026, 6:57 PM
राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यामुळे सावित्री बाई फुले पुणे विद्यामार्फत उद्या घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या...
राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यामुळे सावित्री बाई फुले पुणे विद्यामार्फत उद्या घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती नाशिक दौऱ्यावर येताहेत...या काळात वाहतूक कोंडी होऊ शकते, म्हणून पुणे विद्यापीठाचे उद्याचे सर्व पेपर्स पुढे ढकललेत
30 Oct 2026, 6:53 PM
दौंडमधील अवैध धंदे बंद करा!
दौंड शहरातील कथित अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दौंड पोलीस स्टेशनला निवेदन दिले. अवैध धंद्यांसह सोनसाखळी चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन दौंड पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत शेडगे यांना देण्यात आले. माजी आमदार रमेश थोरात आणि जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दौंडचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली. कारवाई न झाल्यास पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. भिगवण येथील सकुंडे वस्ती परिसरात हा अपघात झाला असून, या धडकेत ट्रॅक्टर आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघाताच्या धडकेमुळे ट्रॅक्टरच्या ट्रेलरमधील ऊस महामार्गावर विखुरला गेला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.
30 Oct 2026, 6:30 PM
दिल्लीतील काँग्रेसच्या महारॅलीसाठी महाराष्ट्रातून ५ हजारांहून अधिक कार्यकर्ते रवाना
- १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅली - महाराष्ट्रातून काँग्रेसचे नेते, खासदार, आमदार, माजी मंत्री आणि पदाधिकारी सहभागी होणार - प्रदेश काँग्रेसचे विविध सेल आणि विभागांचे पदाधिकारीही महारॅलीत सहभागी होणार - लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी राहुल गांधींच्या पुढाकाराने आंदोलन - निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात आवाज उठवणार - एसआयआरच्या नावाखाली १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही काँग्रेसकडून गंभीर आरोप
30 Oct 2026, 6:28 PM
धाराशिवमध्ये भाजप-शिवसेना वाद उफाळला!
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेतील सत्तेचा माज खपवून घेणार नाही. शिवसेनेच्या सदस्यांना वेठबिगार समजाल तर सहा महिन्यांत सत्ता उलथवून टाकू, असा थेट इशारा आमदार तानाजी सावंत यांनी भाजपचे आमदार राणा पाटील आणि अर्चना पाटील यांना दिलाय. सत्ता तुमची नाही, सत्ता आमची आहे. मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवू नका, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपला सुनावलंय. एवढंच नाही, तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना वेठबिगार किंवा गुलाम समजून काम सांगितलं तर काम करू नका, निषेध नोंदवा, असे आदेशही त्यांनी दिलेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीपासून सुरू झालेला भाजप-शिवसेनेतील संघर्ष आता जिल्हा परिषदेत नवा राजकीय पेच निर्माण करण्याची शक्यता आहे
30 Oct 2026, 6:04 PM
जय पवार हे फक्त गेल्या 28 तारखेलाच नव्हेतर तीनदा सीआयडी ऑफिस जाऊन आलेत...
अजितदादांच्या अपघाती मृत्यू चौकशीचा मी सातत्याने फॉलोअप घेत आलोय त्यासाठीच आजवर तिनदा सीआयडी ऑफिसला जाऊन संबंधित तपास अधिकाऱ्यांची भेटही घेतली आहे अशी माहिती जय पवार यांनी झी 24 तासला दिली आहे.
30 Oct 2026, 5:58 PM
गोकुळमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या, 2 नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार
गोकुळमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या, सर्किट बेंचमधील सुनावणीमध्ये महायुतीच्या 12 संचालकांना हजर राहण्याचे आदेश. कोरमचा मुद्दा पुढे करत सभा तहकूब करून लिहिलेल्या इतिवृत्तांवर प्रश्नचिन्ह, समविचारी आघाडीने अध्यक्ष निवड घोषित केल्यानंतर हाय कोर्टात धाव घेतली. 2 तारखेला पुन्हा सुनावणी होणार.
30 Oct 2026, 5:49 PM
ग्राहकांना कपडे खरेदी करताना दिसतायत दुष्काळाचे भयावह वास्तव!
कल्याणमधील विनायक रेडिमेड कपड्यांच्या दुकानात सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत ते पाणी बचतीचे पोस्टर्स. महाराष्ट्राच्या अनेक भागांत निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, हा संदेश देण्यासाठी दुकानदारांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या पोस्टर्सच्या माध्यमातून पाणी बचतीचं महत्त्व पटवून दिलं जात आहे.
मुंबईतील दहिसर पश्चिम परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा एमएचबी कॉलनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, अवघ्या ४८ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांचा निकाल लागल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार धरले होते, त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना नेत्याने निलेश राणे जोरदार पलटवार केला आहे. बिनबुडाचे आरोप करून युतीत मिठाचा खडा टाकू नका, शिवसेनेवर बोलाल तर शिवसेनेसारखेच उत्तर मिळेल, असा थेट इशारा या नेत्याने दिला आहे, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. या निकालानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि इतर काही नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली.
30 Oct 2026, 5:33 PM
युनेस्कोच्या यादीतील चार किल्ल्यांची सुरक्षा होणार भक्कम
युनेस्कोच्या यादीतील चार किल्ल्यांची सुरक्षा होणार भक्कम प्रतापगड, राजगड, साल्हेर व खांदेरी येथे सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा निर्णय किल्ल्यावरील अनुचित प्रकारांना आळा बसणार सुरक्षा रक्षक मंडळाचे 80 सुरक्षा रक्षक करणार तैनात प्रत्येक किल्ल्यावर 19 सुरक्षा रक्षक व 1 पर्यवेक्षकाची करणार नेमणूक
30 Oct 2026, 5:31 PM
बेस्टच्या दिवाळी बोनसवरून राजकीय ट्विस्ट (लिंक कमेंटमध्ये)
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टमधील सर्वच कामगार संघटनांनी केली होती. या मागणीवर बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा देखील झाली होती. नियमानुसार, बेस्टचा दिवाळी बोनस हा बेस्ट समिती अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक यांच्याकडून संयुक्तपणे जाहीर केला जातो. मात्र, आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतली आणि बेस्ट भवनात आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःच बोनस जाहीर केला. या प्रकारावर बेस्ट समितीच्या अध्यक्षा सौ. कृष्णा विश्वासराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बेस्ट प्रशासनाकडून बोनसची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
30 Oct 2026, 5:29 PM
ऊस दरासंदर्भात कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात दुसरी बैठक
ऊस दरासंदर्भात कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेली दुसरी बैठक देखील निष्फळ. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेले बैठक कोणत्याही तोडग्याविना बैठक संपली. बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित.
30 Oct 2026, 5:24 PM
शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणे बेलापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन
तुर्भे येथे रखडलेल्या उड्डाणंपुलाच्या कामामुळे तुर्भे वासियांचे रस्ते अपघातात होतायत मृत्यू. 2 दिवसांपूर्वीच एका महिलेचा रस्ते अपघातात झाला होता मृत्यू. नवी मुंबई मनपा प्रशासन आणि उड्डाणपुलाच्या ठेकेदारा विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे झाडे बेलापूर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
30 Oct 2026, 5:21 PM
एमआय नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी
एमआय नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी, जलील यांच्या कार्यालयावर धमकीच पत्र मिळालं. धमकीच पत्र इम्तियाज जलील यांच्याकडून पोलिसांकडे देण्यात आले, पत्रातून जलील यांना जीवे मारण्याची धमकी. जलील यांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ.
30 Oct 2026, 5:18 PM
समृद्धी महामार्ग रोखण्यावरून शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणारे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे उबाठाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. तब्बल दीड तास चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे
शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.