• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /Zee Entertainment ची मोठी घोषणा, संगीता शेट्टी यांची चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी पदी नियुक्ती

Zee Entertainment ची मोठी घोषणा, संगीता शेट्टी यांची चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी पदी नियुक्ती

झी एंटरटेनमेंटच्या चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी पदावर संगीत शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबर 2026 पासून संगीता शेट्टी या पदावर रुजू होतील.

Reported Bypooja pawar
Published: Oct 30, 2026, 07:07 PM IST|Updated: Oct 30, 2026, 08:00 PM IST
joinshare
Zee Entertainment ची मोठी घोषणा, संगीता शेट्टी यांची चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी पदी नियुक्ती
Image Credit: संगीता शेट्टी बनल्या चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
झी एंटरटेनमेंटच्या महसुलात 13% वाढ; ZEE5 ची कमाई दुप्पट! FIFA वर्ल्डकपचा मोठा फायदा, टीव्ही व्यवसायाचीही झेप

झी एंटरटेनमेंटच्या महसुलात 13% वाढ; ZEE5 ची कमाई दुप्पट! FIFA वर्ल्डकपचा मोठा फायदा, टीव्ही व्यवसायाचीही झेप

2

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने या खेळाडूंवर फोडले खापर..!

3

बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनसची रक्कम आणि तारीखही ठरली; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा!

4

Zee Entertainment ची मोठी घोषणा, संगीता शेट्टी यांची चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी पदी नियुक्ती

5

कांद्याचे दर वर्षभरात दुप्पट; खाद्यतेल, साखर आणि तांदूळही महागले! महागाईचा मोठा झटका; अहवाल काय म्हणतो?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Zee Entertainment : झी एंटरटेनमेंटमध्ये मोठा बदल झाला असून संगीता शेट्टी यांची चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी या पदांवर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. 29 ऑक्टोबर 2026 रोजी आशीष अग्रवाल यांनी राजीनामा दिल्यावर 2 नोव्हेंबर 2026 पासून संगीता शेट्टी या चीफ कंप्लायंस ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी या पदावर रुजू होतील.

दोन दशकांहून अधिकचा अनुभव :

संगीता शेट्टी यांच्याकडे कॉर्पोरेट गवर्नेंस आणि रेग्युलेटरी कंप्लायंस या क्षेत्रात दोन दशकांहून अधिकचा अनुभव आहे. त्या थेट चीफ एग्झिकेटीव्ह ऑफिसर पुनीत गोयनका यांना रिपोर्ट करेल. मुंबईमध्ये स्थित असलेल्या कंपनीच्या मुख्यालयात संगीता शेट्टी काम करतील. नॉमिनेशन एंड रेम्युनरेशन कमिटीने त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2026 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या झालेल्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली.

प्रशासन आणि अनुपालनावर लक्ष :

संगीता शेट्टी आपल्या नवीन भूमिकेत कंपनीची प्रशासन चौकट अधिक बळकट करण्यावर, नियामक अनुपालनात सुधारणा करण्यावर आणि भागधारकांशी संवाद अधिक दृढ करण्यावर काम करतील. कंपनीने नमूद केले आहे की हे पाऊल त्यांच्या भविष्यातील वाढीच्या योजनांशी सुसंगत आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणारी भक्कम प्रशासन मानके प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश आहे.

कंपनीचे सीईओ पुनीत गोयनका यांनी म्हंटलं की मजबूत गवर्नेंस आणि पारदर्शकता, सतत विकास आणि भागधारकांच्या विश्वासासाठी खूप गरजेचं आहे. त्यांनी म्हटलं की, लिस्टेड कंपन्यांसाठी कंप्लायंस प्रक्रियेला सांभाळण्यासाठी शेट्टी यांचा व्यापक अनुभव आहे. जे कंपनीच्या संस्थागत क्षमतांना मजबूत करण्याकरता मदतशीर ठरेल.  

हेही वाचा : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीआधीच बँक खात्यात ₹2000;मोबाईलवर असे तपासा

संगीता शेट्टी यांची कारकीर्द :

संगीता शेट्टी या कंपनी सेक्रेटरी असून इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ACS 18865) याच्या त्या असोसिएट सदस्य आहेत. कंपनी अधिनियम 2013, SEBI (LODR), SAST, PIT, ICDR आणि इनसाइडर ट्रेडिंग गव्हर्नेन्स सारख्या क्षेत्रांमध्ये विशेषता प्राप्त केली आहे. त्यांच्याकडे एंटरप्राइज कंप्लायंस फ्रेमवर्क तयार करण्याचा आणि त्रुटीमुक्त फायलिंग सुनिश्चित करण्याचा उत्कृष्ट अनुभव आहे.

संगीता शेट्टी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एबॉट इंडिया लिमिटेड, आदित्य बिड़ला सन लाइफ इंश्योरेंस, आदित्य बिड़ला मनी, एडेलवाइस ग्रुप, MSEI, एंजल वन या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Maharashtra News