)
- नागपूर शहरात बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी अद्याप राज्य शासन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणत्याही कंपनीला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही......
- त्यामुळे शहरात अनधिकृतपणे बाईक टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे....
- शहरात काही ठिकाणी बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आरटीओने नागरिकांना सतर्क केले आहे....
- प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे....
बातमी आहे शिरूर च्या न्हावरे परिसरातून... जिथे बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडालीय. न्हावरे परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असून, रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या निवासस्थानाजवळ बिबट्याने थेट प्रवेश केला. शिकार शोधत आलेल्या या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आणि हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरवस्तीत बिबट्या आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता वनविभाग या बिबट्याचा बंदोबस्त कधी करणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याबद्दल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समर्थनार्थ बॅनर
शहरातील विविध उपनगरांमधील चौकाचौकांत समर्थनाचे बॅनर झळकले
'पुण्याला साजेसा, पुण्याला आपलं घर मानणारा आणि निर्मळ मनाने निःस्वार्थ काम करणारा आयुक्त' असा बॅनरवर मजकूर
'पुण्याचा आपला आयुक्त' अशा आशयातून आयुक्तांच्या कामाचे कौतुक
आयुक्तांनी सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला सजग पुणेकरांचा पाठिंबा
शहरातील विविध चौकांमध्ये लागलेल्या बॅनरची पुणेकरांमध्ये चर्चा
रात्री उशिरा रायगडच्या म्हसळा येथे भिषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मनन पांचाळ आणि साईराज भोसळ अशी मृतांची नावे असून अभिषेक देवघरे आणि आर्यन शिंदे हे जखमी झाले आहेत. हे चौघे महाड एम आयडीसीतील बिर्ला ओपस कंपनीतील कामगार असून श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. परत येत असताना श्रीवर्धन माणगाव रस्त्यावर म्हसळा बायपासच्या तीव्र उतारावर कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्या शेजारी खड्डयात कोसळून हा अपघात झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पारा १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. या बोचऱ्या थंडीसोबतच पहाटेपासून सकाळपर्यंत दाट धुक्याची चादर पसरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट आणि बावनदी परिसरात दृश्यमानता कमालीची घटली आहे. परिणामी,सकाळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने ''''फॉग लाईट्स'''' सुरू ठेवून व वाहनांचा वेग मंदावून अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे..
अकोला शहरात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी करण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच शहरातील बांधकामांसाठी उमरी परिसरातील एसटीपी अर्थातच सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आता याच एसटीपीच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अकोला शहरातील ताठोड नगर परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरू असून, अरुंद रस्त्यांवरून होणाऱ्या या वाहतुकीमुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. लहान मुलांना घराबाहेर खेळणेही कठीण झाले असून, टँकरच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचीही दुरवस्था झाली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या टँकर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी आज संतप्त रहिवाशांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.
छत्रपती संभाजी नगरात अनधिकृत बांधकामावर 15 दिवसाच्या नोटेचे नंतर आता बुलडोझर चालणार आहे मनपाने असा इशारा नागरिकांना दिला आहे.. झोन कार्यालयांतील सहायक आयुक्त आणि इमारत निरीक्षकांमार्फत शहरातील बांधकामांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नगररचना विभागाच्या ऑनलाइन 'बीपीएमएस' प्रणालीद्वारे त्यांची वैधता तपासली जाईल. या प्रणालीचा 'लॉगिन आयडी' सर्व झोन अधिकाऱ्यांना दिल्याने बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत, याची खात्री जागेवरच होणार आहे. अनधिकृत बांधकाम मालकांना नियम २६० अंतर्गत नोटिसा बजावून दंड भरून नियमितीकरणासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. मुदतीत कार्यवाही न झाल्यास थेट बुलडोझर चालवण्यात येईल, असा इशारा आता मनपाने दिलाय..
नोव्हेंबर महिन्यातच पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र झाली असून, ३९१ टँकरद्वारे ३४५ गावे आणि २ हजार ७१ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २४२ टँकर सुरू आहेत. सांगलीत ७४, साताऱ्यात ५३, पुण्यात २२ टँकर सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर नाही. विभागातील ७ लाखांहून अधिक नागरिकांना टंचाईचा फटका बसला आहे.
पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोची अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. ही परवानगी मिळताच टर्मिनल प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. जुने आणि नवीन अशी दोन्ही टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता दुप्पट होणार असून, गर्दी आणि प्रतीक्षेचा वेळ कमी होणार आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 November 2026 : राज्यामध्ये आज अनेक मोठ्या घडामोडी होत आहे या घडोमोडी वाचण्यासाठी या ब्लॅागमध्ये वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स मिळतील. नोव्हेंबर महिन्यातच पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र झाली असून, ३९१ टँकरद्वारे ३४५ गावे आणि २ हजार ७१ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोची अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. ही परवानगी मिळताच टर्मिनल प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. सर्व महत्त्वाच्या अपडेट्स ब्लॅाग वाचण्यासाठी लाईव्ह ब्लॅाग रिफ्रेश करा.