• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मोठ्या राजकीय घडामोडीची चाहूल? शरद पवारांना भाजपाची ऑफर? विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच...

मोठ्या राजकीय घडामोडीची चाहूल? शरद पवारांना भाजपाची ऑफर? विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच...

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक ऑफर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नेमकी ही चर्चा काय जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 23, 2026, 08:49 IST|Updated: Nov 23, 2026, 09:15 IST
joinshare
मोठ्या राजकीय घडामोडीची चाहूल? शरद पवारांना भाजपाची ऑफर? विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच...
Image Credit: विलिनीकरणासंदर्भातील चर्चा सुरू असतानाच ही ऑफर? (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठ्या राजकीय घडामोडीची चाहूल? शरद पवारांना भाजपाची ऑफर? विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच...

मोठ्या राजकीय घडामोडीची चाहूल? शरद पवारांना भाजपाची ऑफर? विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच...

2

देशातील सर्वात मोठा पॅकेज्ड वॉटर ब्रँड बिस्लेरीच्या टेस्टचा हादरवणारा रिपोर्ट, कॅन्सरचे घटक...काय म्हणाले FSSAI?

3

महाराष्ट्रात रुग्णालयांसंदर्भात लवकरच नवा कायदा! सर्वसामान्यांना मोठा फायदा; 'ही' गोष्ट सर्व रुग्णालयांना बंधनकारक

4

हर्षित राणा आऊट अन् मैदानावर ड्रामा! पाकिस्तानच्या खेळाडूने केला शिवीगाळ, पहा Video

5

उल्हासनगरमधील जमिनींसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! सिंधी समाजाला दिलासा; म्हणाले, 'नागपूरमधून...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा मागील नऊ महिन्यांहून अधिक काळापासून सुरु आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांना पुन्हा उधाण आलं. मात्र यासंदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नसून विलिनीकरणाचा पेच कायम असतानाच भारतीय जनता पार्टीने शरद पवारांच्या पक्षाला एक ऑफर दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून एक विशेष ऑफर देण्यात आल्याचे समजते.

भाजपाची ऑफर काय?

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने महायुतीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामील होण्यास भाजप तयार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांना विलिन न करता शरद पवारांचा पक्ष आहे त्या स्थितीत एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यास भाजपा तयार असल्याचे समजते. मात्र दोन्ही राष्ट्रावादींच्या विलिनीकरणाचा पेच कायम असल्याने यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय होऊ शकतलेला नाही. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित 128 वं घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच 'एनडीए'ला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. हा दोन तृतीयांश खासादारांचा आकडा गाठण्यासाठी 'एनडीए'ला खासदारांची संख्या कमी पडत आहे. दोन तृतीयांश खासदार म्हणजेच 360 हून अधिक खासदारांचा पाठिंबा या विधेयकासाठी आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटासोबत भाजपची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप कोणत्याही निर्णयावर दोन्हीही पक्ष पोहोचले नाहीत, असं सांगितलं जात आहे.

विलिनीकरणामध्ये अडचण काय?

दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपाच्या माध्यमातून घडवून आणण्याचीही चर्चा आहे. मात्र या विलिनीकरणामध्ये अनेक अडथळे आहेत. या विलिनीकरणानंतर काय? या प्रश्नानंतरही अनेक प्रश्न अजून चर्चा स्वरूपात असल्याचे समजते. विलीनीकरण झाले तर नेतृत्व कोणाकडे? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, तर सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल? विलिनीकरणानंतर अजित पवार गटातील वरिष्ठ नेते आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये सत्तावाटपाचा प्रश्न निर्माण होईल, त्याचं काय? पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना विलिनीकरणामुळे जास्त फायदा होईल, असेही बोलले जात आहे.

पवारांनी भूमिका सोडलेली नाही

शरद पवार हे पुढील आठवड्यात सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र सत्यशोधक परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी इतरांशी असलेल्या आपल्या विचारधारेशी तडजोड केली नसल्याचे त्यांच्या जवळच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महायुतीत येण्यासाठी भाजप तयार आहे, पण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हा अजूनही गुंतागुंतीचा प्रश्न कायम असल्याने आगामी काळात काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Sharad Pawar
Maharashtra Politics
Indian Politics