)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सह्याद्रीवर दाखल झाले आहेत.
- भ्रष्टाचारात नाशिकचा सलग दुसऱ्या वर्षीही डंका!
- लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये नाशिक विभाग राज्यात अव्वल...
- २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तब्बल १२१ सापळा प्रकरणांची नोंद..
- १९६ लाचखोरांना लाच घेताना रंगेहात पकडलं...
- पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईलाही टाकलं मागे...
- मात्र, कारवाईच्या आकडेवारीमागचं धक्कादायक वास्तव समोर
तब्बल ९६ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित...
- केवळ १५ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल...
- लाचखोरांना पकडण्यात नाशिक आघाडीवर, मात्र दोषसिद्धीचं काय?
- कारवाईचा धडाका जोरात, पण तपासाचा वेग मंदावला!
शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. इतर कैद्यांकडून चेहऱ्यावर वार करण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा आफताबने न्यायालयात केला. या दाव्याची गंभीर दखल घेत दिल्ली न्यायालयाने सोमवारी तिहार कारागृह प्रशासनाला त्याच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
कोणीही अनिश्चित काळासाठी जागेवर ताबा मिळवू शकत नाही”; दिल्ली आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि इतरांकडून एका याचिकेवर उत्तर मागवले आहे. व्यापारी संघटनांनी दाखल केलेल्या या याचिकेत सणासुदीच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेली निदर्शने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, यावर भर देतानाच न्यायालयाने म्हटलं की, कोणत्याही नियुक्त आंदोलन स्थळावर अनिश्चित काळासाठी ताबा मिळवला जाऊ शकत नाही.
राम पूर्णेकरांच्या जीवाला धोका आहे. पूर्णेकर कुटुंबाला पोलीस संरक्षण वाढवून द्या, अशी मागणी मीनाक्षी शिंदेंनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. माझं आणि राजेंद्र शिंदेंचं नाव घेण्यासाठी राम पूर्णेकरांना प्रवृत्त केल्याचाही आरोपही मीनाक्षी शिंदेंनी केला आहे. "मी काही केलं नाही म्हणून सुरुवातीला राजीनामा दिला नव्हता. मात्र माझ्या नेत्यावर आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला," असं ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी म्हटलं आहे.
दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत, मात्र अदयाप बीएमसीने व्हिडियो पोस्ट केला नाही. दिया मिर्झाच्या व्हिडीओवरील टीकेवरून मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. बीएमसीच्या पर्यावरणपूरक दिवाळी मोहिमेवरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर मुंबई हायकोर्टानं तीव्र आक्षेप घेतला.
आज राज्य मंत्रिमंडळ बैठकी आधी शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक होणार, गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप नंतर बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमधील गेल्या काही दिवसांतील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या शिवसेनेच्या प्री-कॅबिनेट बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर पार पडणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता न्यायालयात युक्तिवाद करतील. सुनावणी दुपारी 2 वाजता होणार आहे.
आपला पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नाहीत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामे होतं नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी तक्रार केली. एका माजी मंत्र्याने अर्थमंत्री पदाबाबत नेमके काय झाले, याबाबत बैठकीत स्पष्टीकरण मागितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी निवासस्थानी आमदरांची बैठक झाली या बैठकीत आमदारांना येणाऱ्या अडचणी आणि भावना व्यक्त करण्याची वरिष्ठ नेतृत्वाने सूचना दिली. आमदारांनी वरिष्ठ नेत्यांमधील संघर्षाबाबत विचारणा करत म्हटले की, हे वाद खालीपर्यंत कळत नाहीत आणि पक्ष कमजोर होत आहे. सत्तेत असूनही कामे होत नसल्याची तक्रार करत एकनाथ शिंदे यांच्याकडून कामकाज होत नसल्याचे आमदारांनी सांगितले.
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना पक्षात एकटं पाडलं जातंय, असं गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. तर भुजबळ, मुश्रीफ सोडून सर्वांनी अजित पवार जिंवत असताना त्रास दिला असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी हा आरोप केलाय. तसेच भाजपदेखील पार्थ आणि जय या दोन भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींपासून ते देशातील राजकीय क्षेत्रातील हलचालींपर्यंत आणि गावगल्लीतील अपडेट्सपासून ते अंतरराष्ट्रीय बातम्यांपर्यंत सारं काही एकच ठिकाणी... दिवसभरातील ताज्या घडामोडींच्या ए टू झेड अपडेट्स तुम्ही या पेजवर पाहू शकता, ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...