• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE: ताज्या घडामोडींचा वेगवान आढावा | 25 Nov 2026
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: ताज्या घडामोडींचा वेगवान आढावा | 25 Nov 2026

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 November 2026: महाराष्ट्राबरोबरच देशातील ताज्या घडामोडींच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 08:51 IST|Updated: Nov 25, 2026, 09:03 IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE: ताज्या घडामोडींचा वेगवान आढावा | 25 Nov 2026
Image Credit: दिवसभरातील ताज्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी
25 Nov 2026 08:56 IST
share

शंभूराज देसाईंनी युतीधर्म पाळला नाही सातारा जिल्हा बँकेवरुन जयकुमार गोरेंचा आरोप

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युत्तर दिले आहे. नेतृत्वाच्या आदेशावरून युती केली नसती तर अर्जुन काळेंप्रमाणे आणखी सात सदस्य निवडून आले असते; मात्र देसाईंनी महायुतीचा धर्म न पाळता अर्जुन काळेंना पाडण्याचे प्रयत्न केले, हे त्यांना शोभत नसल्याचा टोला गोरेंनी लगावला. तसेच आता जिल्हा बँक आपल्या ताब्यात असून बँकेतील सर्व गफले, १०० कोटींचे सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप खरेदीची प्रकरणे बाहेर काढून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करू, असा इशाराही त्यांनी दिला तर कुणी येते धर्म पाळला नाही पाळला कुणी काय केलं हे सातारा जिल्ह्यातील लोकांना माहित आहे असा टोला शंभूराज देसाई यांनी दिला.

25 Nov 2026 08:55 IST

एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा, सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वीज प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीवर अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी गेल्या दोन वर्षांपासून डोंगर पोखरले जात असून, अतिदुर्मिळ झाडांची कत्तल केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या नसतानाही हे काम सुरू असल्याचा दावा सयाजी शिंदे यांनी केला आहे. भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही दोन वर्षांपासून झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप, 3 डिसेंबरला पुणे विभागीय आयुक्ता कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

25 Nov 2026 08:53 IST

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मैदानात शिवसेना उतरणार, 35 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय

उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबद्दल मोठा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशात 35 विधानसभा जागांवर उमेदवार देण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली आहे. राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याकडून ही मोठी घोषणा केली आहे.

25 Nov 2026 08:50 IST

त्यामुळे कोणतंही आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह आणि झेंडा वापरत नाही, रोहित पवारांचे स्पष्टीकरण

पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन हे विद्यार्थ्यांचं होतं. तिथे आपण चिन्ह वापरलं नव्हतं. पंढरपुरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही पक्षाचं चिन्ह वापरलं नव्हतं. कारण हे विषय मोठे होतं आणि त्यामध्ये राजकारण येऊ नये असा आमचा प्रयत्न होता. अशा आंदोलनामध्ये जर पक्षाचं चिन्ह आलं तर त्या आंदोलनाला राजकीय भूमिका आहे असं काहीजण म्हणू शकतात. त्यामुळे नागपूरच्या ट्रॅक्टर मोर्चामध्येही आम्ही पक्षाचं चिन्ह वापरणार नाही, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.

25 Nov 2026 08:49 IST

आज शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाची सुनावणी

शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या सुनावणीत कोर्टाने बुधवारी सुनावणी घेऊ असं सांगितले होते. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
News in Marathi
Marathi Batmya
Maharashtra Politics

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठी बातमी! नागपुरात रोहित पवारांची युवा नेत्यांसोबत बैठक, पवारांच्या निवृत्तच्या बातमीदरम्यान राष्ट्रवादीत खलबतं

मोठी बातमी! नागपुरात रोहित पवारांची युवा नेत्यांसोबत बैठक, पवारांच्या निवृत्तच्या बातमीदरम्यान राष्ट्रवादीत खलबतं

2

'16 लाखांचा दर निश्चित केला...', खाजगी कार्यक्रमाच्या नावाखाली अभिनेत्याकडे अश्लील मागणी! स्वत: केला खुलासा

3

मोदींचा गाजावाजा झाला अन् गुंतवणूकदारांचे ₹500000 कोटी बुडाले... 'प्रभाव' कुठे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल; '...तर ही प्रगती नेमकी कोणाची?'

4

हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे, विदर्भाला अलर्ट; तर 8 राज्यात जोरदार पाऊस

5

आर्यवीर सेहवागची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री, बेस प्राइज किती पाहिलत का?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 November 2026: राजकीय घडामोडींबरोबरच आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि नावासंदर्भातील सुनावणी होणार असून ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत. या प्रकरणाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडत असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बातम्यांसोबतच ताज्या घडामोडींचे सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लेटेस्ट अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...