)
DELHI : राजधानी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात व्होट बचाव, देश बचाव रॅली निघणार आहे... ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.... महाराष्ट्रातून पाच हजार पेक्षा जास्त नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती...
MUMBAI CNG PRICE : मुंबईत आजपासून सीएनजी प्रतिकिलो 1 रुपयानी महागला आहे... आधीच वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक कात्री लागणार आहे... मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ९० रुपये इतका झाला आहे.... देशात तयार होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतींबरोबरच आयात केलेल्या वायूच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यातच देशांतर्गत उपलब्ध होणाऱ्या गॅसचा पुरवठा देखील कमी आहे... यामुळे महानगर गॅसकडून CNGच्या दरात एक रुपयाची वाढ झालीय...
COMMERCIAL GAS : सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत... व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 10 रुपयांनी महागला आहे... आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी 2 हजार 774 रुपये मोजावे लागणार आहेत... दरम्यामन घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही...
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 01 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.