Maharashtra Breaking News LIVE : 02 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 02 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 02 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
02 Nov 2026, 8:40 AM
'अर्णब'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचं संकट
MURASU CYCLONE : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रविवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे... हे चक्रीवादळ वेगाने भारताच्या दिशेन सरकत असून उद्या हे वादळ आंध्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे...भारताने या वादळाला 'मुरासू' असे नाव दिले आहे... या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर आणि झंझावाताचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे... वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत...या वादळाचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवण्याची शक्यता आहे..
02 Nov 2026, 8:33 AM
पीएफची माहिती व्हॉट्सअॅपवर पाहता येणार
PF INFORMATION ON WHATS APP : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFOने आपल्या लाखो पीएफ खातेधारकांसाठी नियम आणि सेवा लक्षणीयरीत्या सोप्या केल्या आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या 74 व्या स्थापना दिवशी, दोन प्रमुख वैशिष्ट्ये सुरू केली. पहिले वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सॲप सेवा आणि दुसरे म्हणजे बंद किंवा निष्क्रिय ईपीएफ खात्यांचे स्वयंचलित सेटलमेंट.
02 Nov 2026, 8:31 AM
फ्लोरिडात भीषण विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू
AMERICA PLANE ACCIDENT : अमेरिकेतून एका भीषण विमान अपघाताची बातमी समोर आली आहे... फ्लोरिडामध्ये एक खासगी विमान थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळले... विमान आदळताच एक मोठा स्फोट झाला आणि रस्त्यावर आगीचे लोळ पसरले... या स्फोटामुळे रस्त्यावर एक खोल खड्डा पडला असून, विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले गेले आहेत... अपघाताच्या वेळी विमानात 9 लोक होते, ज्यांचा सर्वांचा मृत्यू झाला आहे... या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत...काळजाचा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय..
02 Nov 2026, 8:17 AM
सीएसएमटी-मडगाव वंदे भारत 16 डब्यांची होणार
CSMT-MADGAON VANDE BHARAT : सीएसएमटी-मडगाव वंदे भारत १६ डब्यांची होणार आहे... दिवाळी सुट्टीत सीएसएमटी ते मडगाव या स्थानकांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता ८ डब्यांऐवजी १६ डब्यांची धावणार आहे....दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर, १० नोव्हेंबरपासून ही गाडी वाढीव डब्यांसह प्रवासी सेवेत दाखल होणार आहे....त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळणारेय...
02 Nov 2026, 8:16 AM
दिवाळीत अन्न, औषध प्रशासन अधिक अलर्ट
FDA ALERT : दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई बनवण्यासाठी भेसळयुक्त खवा, मावा आणि अन्य पदार्थांचा वापर केला जातो.....त्यामुळे दिवाळीत अन्न , औषध प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे.... दिवाळीच्या तोंडावर तेल, मसाले, ड्रायफ्रूट्स, दुधाचे पदार्थ आणि रंगांची कसून तपासणी केली जात आहे.... यावेळी फराळात भेसळ आढळली तर भेसळखोरांची दिवाळीच अंधारात जाईल, असा इशाराच एफडीएने दिला आहे.... तसंच गोदामे, पदार्थ दुकानांमध्ये पोहोचण्यापूर्वी जिथून जातो त्या ठिकाणांची तपासणी एफडीएकडून करण्यात येत आहे...त्याचबरोबर लाडू आणि फराळाच्या विक्रीच्या वेळाही तपासणार आहे....
02 Nov 2026, 8:15 AM
नोव्हेंबर महिना तापदायक राहणार
NOVEMBER HEAT : ऑक्टोबरमधील उन्हाच्या तीव्र झळा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिनाही तापदायक राहणार आहे... प्रशांत महासागरात 'एल निनो' स्थितीची तीव्रता वाढल्याने हिवाळ्यातही तापमान वाढ नागरिकांना हैराण करणार आहे.... नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांना उष्णतेचा तडाखा बसणार आहे..... सध्या प्रशांत महासागरात अत्यंत तीव्र 'एल निनो' स्थिती निर्माण झाली आहे.... त्याचा परिणाम भारताच्या वातावरणावर जाणवणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे....
02 Nov 2026, 8:13 AM
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री दरोडा
MAHALAXMI EXPRESS : मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ते सहा महिला प्रवाशांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर आरक्षित डब्यातील महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी चोरट्यांनी एस-२, एस-३ आणि एस-४ डब्यांवर दगडफेकही केली. घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.