SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

4 निळे ड्रम जमिनीत गाडले, ड्रममध्ये दिसले ते पाहून पोलिस हादरले! UP मध्ये मुंबई पोलिसांची कारवाई, प्रकरणाचे थेट पुणे कनेक्शन

4 निळे ड्रम जमिनीत गाडले, ड्रममध्ये दिसले ते पाहून पोलिस हादरले! UP मध्ये मुंबई पोलिसांची कारवाई, प्रकरणाचे थेट पुणे कनेक्शन

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 29, 2026, 10:21 PM IST | Updated: Oct 29, 2026, 10:25 PM IST
Join

उत्तर प्रदेश क्राईम : मुस्कान प्रकरणामुळे निळे ड्रम चर्चेत आले. यानुळे निळे ड्रम पाहिले की सर्वांनाच धडकी भरते. उत्तर प्रदेश  जमिनीत गाडले 4 निळे ड्रम पोलिसांना सापडले आहेत. हे ड्रम उगडल्यावर आत जे दिसले ते पाहून पोलिसही हादरले आहेत. तब्बल 40 पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी हे चारही ड्रम ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी प्रयागराज पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणाचे पुणे कनेक्शन देखील समोर आले आहे. 

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बराईपूर गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.  पोलिसांनी एका घरावर धाड टाकली. चौकशीदरम्यान पोलिसांनी जमिनीखाली गाडलेले तीन निळे ड्रम हस्तगत केले आहे. ड्रम उघडल्यावर आतमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे शेकडो बंडल सापडले आहेत. नोटांनी भरलेले निळे ड्रमच्या चर्चा वाऱ्यासारखी गावभर पसरली. 40 पोलिसांचे पथक या घरात झडती घेत होते. 

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

मुंबई पोलीस आणि प्रयागराज पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.  28 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा बराईपूर रामनगर गावात  राजेश यादव आणि राकेश यादव उर्फ ​​महाकाल यांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला. पोलिसांनी घरातील एका खोलीची जमीन खोदली. यावेळी जमिनीखाली पुरलेले 3 निळे ड्रम पोलिसांना सापडले. 

हे ड्रम नोटांनी भरलेले होते. ड्रमच्या आता कापडात 500 रुपयांच्या नोटांच्या बंडल गुंडाळून ठेवण्यात आले होते. जप्त केलेली रक्कम चार ते पाच कोटी रुपये असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. एडीसीपी पुष्कर वर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशीचा आढावा घेतला.

मुंबई पोलिस आरोपीच्या शोधात गेले आणि घबाड सापडले

एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी राकेश यादवला अटक करण्यासाठी   मुंबई पोलीस प्रयागराजच्या नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरई राम नगर गावात आले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. राजेश यादवचा भाऊ बबलू यादव अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता. कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये लागू झालेल्या लॉकडाऊन लागला. यावेळी तो गावात परत आला.  त्यावेळी त्याचे दोन मेहुणे आणि एक मेहुणाही त्याच्यासोबत होते. प्राथमिक माहितीनुसार, जप्त केलेले पैसे त्यांच्यामार्फत आणण्यात आले होते असे सांगितले जात आहे. आरोपींकडे ऐवढी मोठी रक्कम कुठून आली याचा पोलिस तपास करत आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES