• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होणार? जगभरात 3.73 लाख लोकांचा जीव धोक्यात, अल निनोचा हवामानावर महाभयानक परिणाम

मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होणार? जगभरात 3.73 लाख लोकांचा जीव धोक्यात, अल निनोचा हवामानावर महाभयानक परिणाम

जगभरात अल निनोचा धोका वाढत आहे. मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. जगभरात 3.73 लाख लोकांचा जीव धोक्यात आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 29, 2026, 11:48 PM IST|Updated: Oct 29, 2026, 11:51 PM IST
joinshare
मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होणार? जगभरात 3.73 लाख लोकांचा जीव धोक्यात, अल निनोचा  हवामानावर महाभयानक परिणाम

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होणार? जगभरात 3.73 लाख लोकांचा जीव धोक्यात, अल निनोचा  हवामानावर महाभयानक परिणाम

मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होणार? जगभरात 3.73 लाख लोकांचा जीव धोक्यात, अल निनोचा हवामानावर महाभयानक परिणाम

2

पगार मिळतोय, पण बचत किती? AI च्या मदतीने तयार करा रिटायरमेंट प्लॅन

3

4 निळे ड्रम जमिनीत गाडले, ड्रममध्ये दिसले ते पाहून पोलिस हादरले! UP मध्ये मुंबई पोलिसांची कारवाई, प्रकरणाचे थेट पुणे कनेक्शन

4

देवेंद्रजी आपली युती तेव्हा... उद्धव ठाकरेंनी सांगितला त्या व्यंग्यचित्राचा किस्सा

5

टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

el Nino : सुपर अल निनो सक्रिय झाला आहे. या भारताच्या मान्सूनला याचा मोठा फटका बसला आहे. अन निनोमुळे पर्ज्यनमान घटले आहे. यामुळे भारतातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. तर, भारतावर मोठं जल संकट ओढावण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. अशातच भविष्यात  अल निनोचा भारताच्या हवामानावर महाभयानक परिणाम होणार. मार्च 2027 पर्यंत भारतात 55,000 लोकांचा मृत्यू होणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. एका हवामान विश्लेषकाने हा धोक्याचा अलर्ट दिला आहे. 

यंदाचा अल निनो 1950 नंतरचा सर्वात शक्तिशाली अल निनो असल्याचे जागतिक वैद्यकीय संघटनेने (WMO) म्हटले आहे. एका हवामान विश्लेषकाने 'सुपर एल निनो'बद्दल अत्यंत धोकादायक इशारा दिला आहे. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतात उष्णतेमुळे सुमारे 55,000 मृत्यू होऊ शकतात. जागतिक स्तरावर पुढील सहा महिन्यांत 3,73,000 हून अधिक अतिरिक्त मृत्यू होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. 

2026 मध्ये सुपर अल निनो सक्रिय झाला आहे. यामुळे जगभरातील पर्जन्यमानात बदल होत आहे. तर, तापमानात देखील वाढ होत आहे. हवामानात होत असलेय्या बदलांचा आढावा घेण्यासाठी क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने अल निनोच्या उष्णतेमुळे मानवांना होणाऱ्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी 'अल निनो हीट मॉर्टॅलिटी ट्रॅकर' नावाचे एक नवीन साधन विकसित केले आहे. या ट्रॅकरच्या मदतीने  मासिक गोळी केला जात आहे. यामध्ये पुढील सहा महिन्यांतील संभाव्य मृत्यूंच्या अंदाजाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जून 2026 मध्ये अल निनो सक्रिया झाला आहे. तेव्हापासून उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या नोंदवण्यात आली आहे. जगभरातील राज्यांकडून माहिती पुरवून, हे साधन निधी पुरवणाऱ्यांना आणि व्यावसायिकांना सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांविषयी सखोल माहिती देते. यामुळे संसाधनांची सर्वाधिक गरज कुठे आहे आणि कुठे जीव वाचवता येतील हे ओळखण्यास मदत होत आहे.

एकूण किती लोकांचा मृत्यू होऊ शकतो?

या ट्रॅकरने मार्च 2027 पर्यंतचा डेटा गोळा केला आहे. मार्चपर्यंतचा डेटा समाविष्ट आहे. यानुसार, अल निनोमुळे वाढलेल्या उष्णतेमुळे एकूण अंदाजे 8,57,000 मृत्यू होऊ शकतात अशी भिती व्यक्त केली आहे.  त्यापैकी अंदाजे 3,73,000 मृत्यू पुढील सहा महिन्यांत होण्याची शक्यता आहे. 

क्लायमेट इम्पॅक्ट लॅबचे सह-संस्थापक आणि शिकागो विद्यापीठातील मिल्टन फ्रीडमन डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स, मायकल ग्रीनस्टोन यांनी याबाबत माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे तीव्र उष्णतेच्या प्राणघातक परिणामांचा अंदाज लावता येणे हे एक मोठे पाऊल आहे. यामुळे लोकांना सर्वाधिक धोका कुठे आहे हे आपण ओळखू शकतो. यामुळे जीवितहानी होण्यापूर्वी आवश्यक ती कारवाई करता येवू शकतो. 

ट्रॅकरच्या मदतीने काढता आला मृत्यूचा आकडा?

सर्वाधिक मृत्यू कुठे होतील त्या ठिकाणाचा निश्चित अंदाज लावता आलेला नाही. मात्र, अल निनोच्या उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यू विकसनशील देशांमध्ये होऊ शकतात. पुढील सहा महिन्यांच्या म्हणजे ऑक्टोबर 2026 ते मार्च 2027 दरम्यान धोका आणखी वाढणार आहे.  नायजेरियामध्ये अल निनोच्या उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. या सहा महिन्यांत तेथे अंदाजे 56,000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्यानंतर भारताचे नाव समोर येत आहे. भारतात उष्णतेमुळे अंदाजे 55,000 मृत्यू अपेक्षित असून, यापैकी बहुतेक मृत्यू मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather
News in Marathi