SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अभिनेता तुषार कपूर, आयुष्मान खुरानाला धमकी देणारा अटकेत, पण समोर आली हादरवणारी माहिती, लॉरेन्स गँगशी संबंधच नाही...

मुंबई पोलिसांनी बंगळूर येथील एका आयटी इंजिनिअरला आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकीचे संदेश पाठवल्याप्रकरणी आणि कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 10:05 AM IST | Updated: Nov 07, 2026, 10:07 AM IST
Image Credit: Lawrence Bishnoi news
Join

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड दहशतीखाली खाली. टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेता तुषार कपूर आणि अयुष्मान खुरानाला धमकीचे मेसेज आले होते. आता या प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेकांना धमकी देणारा वैभव मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी वैभव मिश्रा हा आयटी इंजिनिअर असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्रभावाखाली असल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपी वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचे व्हिडिओ वारंवार पाहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. आरोपीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे भासवून अभिनेत्यांना धमकी दिल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेंगळुरूमधून अटक केली आहे. तर, न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

आरोपी वैभवने अभिनेत्यांचे नंबर ऑनलाइनरित्या शोधून काढले. त्यानंतर मोबाईल नंबर ऑनलाइन मिळाल्यास ऑडिओ मेसेजद्वारे, तर काहींना इन्स्टाग्रामवरून धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपीने मोबाईलमधील जुना डेटा आणि रेकॉर्ड डिलीट केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसंच, आरोपीकडून इतर कोणत्या व्यक्तींना धमकी देण्यात आली, याचा तपास सुरू.

प्राथमिक माहितीनुसार, धमक्यांमधून पैसे उकळण्याचा त्याचा उद्देश होता की लॉरेन्स बिश्नोई गँगच्या व्हिडिओंचा प्रभाव होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

तुषार कपूरला आली होती धमकी

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर याला कथितरित्या एक फोन आला होता. तेव्हा  फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य 'हॅरी बॉक्सर' म्हणून सांगितली आणि 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. अभिनेत्याने या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.

गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या फोनमधील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासले असून, त्यांच्या डेटाबेसमधील 'हॅरी बॉक्सर'च्या अधिकृत ऑडिओ नमुन्यांशी आवाजाची जुळवणी करत होते. मात्र वरिष्ठ पोलीस सूत्रांनुसार, हे नमुने जुळले नाहीत, त्यामुळे हा फोन बनावट होता किंवा कोणीतरी धमकावण्यासाठी टोळीच्या नावाचा वापर केला होता, असा संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करताच आरोपी वैभव मिश्रापर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES