• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार सभागृहात गैरहजर राहणार? समोर आलं मोठं कारण

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार सभागृहात गैरहजर राहणार? समोर आलं मोठं कारण

शरद पवारांच्या राष्ट्रवादी खासदारांना व्हीप जारी केला आहे. संसद अधिवेशनाला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार गैरहजर राहण्याची शक्यता आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 29, 2026, 22:59 IST|Updated: Nov 29, 2026, 23:00 IST
joinshare
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार सभागृहात गैरहजर राहणार? समोर आलं मोठं कारण

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार सभागृहात गैरहजर राहणार? समोर आलं मोठं कारण

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार सभागृहात गैरहजर राहणार? समोर आलं मोठं कारण

2

1 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेल भरताना लागणार 1 टक्के चार्ज, नव्या नियमांचा भुर्दंड कोणाला?

3

पवारांच्या मागे हा निर्णय झाला, जाहीर पत्रात रोहित पवारांचा अत्यंत गंभीर दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

4

माथेफिरुने घरात घुसून तरुणीवर फेकलं ॲसिड! आई-वडिलांवरही चाकूने वार; धक्कादायक कारण आलं समोर!

5

हिवाळ्यात बनवा चवदार 'पाया सूप', सोपी रेसिपी आजच घरी ट्राय करा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शरद पवार : डिलिमिटेशन विधेयक संसदेत सादर होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी खासदारांना व्हीप जारी केला आहे.  संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्हीप जारी करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिप जारी केला आहे.  संसदेच्या अधिवेशनात 30 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत लोकसभेत सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यंत महत्वाच्या कामकाजासाठी न चुकता सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांपैकी 1 खासदार सभागृहात गैरहजर राहण्याची शक्यता आहे. 

संसदेत मांडल्या जाणाऱ्या विधेयकावरून पक्षाने सर्व खासदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे निर्देश देत व्हिप काढला आहे. मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांची तब्येत ठीक नसल्याने आणि उपचार सुरू असल्याने दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात त्यांची उपस्थिती सध्या डॉक्टरांच्या परवानगीवर अवलंबून आहे. डॉक्टरांकडून फिटनेस प्रमाणपत्र, म्हणजेच फिट टू फ्लायची परवानगी मिळाली तर ते नक्कीच दिल्लीला जाणार, अशी माहिती त्यांचे पुत्र सुमित म्हात्रे यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सुमित म्हात्रे यांनी सांगितलं की, पक्षाकडून सर्व खासदारांना व्हिप काढण्यात आला आहे आणि संसदेत उपस्थिती अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण बाल्या मामा यांची सध्याची तब्येत पाहता कुटुंबीय आणि डॉक्टर त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत काळजी घेत आहेत.

सध्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. वैद्यकीय पथकाने त्यांना विमान प्रवासासाठी फिट घोषित केलं तर ते संसदेत पोहोचणार आहेत. अन्यथा तब्येतीला प्राधान्य देत दिल्ली दौरा टाळावा लागेल.
खासदारांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सुमित म्हात्रे यांनी सांगितलं की, कोविड संसर्गादरम्यान बाल्या मामा यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला होता. नुकतेच पुन्हा आजारी पडल्यावर त्यांच्या शरीराच्या एका भागाचं ऑपरेशनही करण्यात आलं. यावेळी फुफ्फुसात असलेला संसर्ग पसरल्याने त्यांचा त्रास वाढला आहे. 

संसर्गामुळे फुफ्फुसांना सूज आली आहे, जी नियंत्रणात येण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जवळपास दोन महिने लागू शकतात. पुन्हा संसर्ग होण्याचा धोका पाहता डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा आणि लोकांना भेटणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. सध्या त्यांच्यावर प्रसिद्ध फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. जरीर उदवाडिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत

93 खासदारांच्या सीटिंगवर अधिकृत माहिती नाही

संसदेत 93 खासदारांची बसण्याची व्यवस्था वेगळी करून त्यांना एनडीए सोबत बसवण्याबाबतच्या चर्चेवर सुमित म्हात्रे म्हणाले, याबाबत त्यांना पक्षाकडून आतापर्यंत कोणतेही अधिकृत पत्र किंवा संदेश मिळालेला नाही. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच यावर काही सांगता येईल असं ते म्हणाले. 

शरद पवारांवरील टिप्पणीवर प्रवक्ते उत्तर देणार

शरद पवार यांच्यावर विजय बठियार यांनी केलेल्या कथित टिप्पणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुमित म्हात्रे म्हणाले, त्यांनी अजून संबंधित वक्तव्य ऐकलेले नाही. मात्र शरद पवार यांच्याविरोधात अशा प्रकारची टिप्पणी केली असेल तर ती मान्य नाही. या प्रकरणात पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच योग्य उत्तर देतील असं सुमित म्हात्रे म्हणाले. 
सुमित म्हात्रे यांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट झालं की, खासदार बाल्या मामा यांच्या संसदेतील उपस्थितीचा अंतिम निर्णय त्यांची तब्येत आणि डॉक्टरांच्या फिटनेस परवानगीवरच घेतला जाणार आहे. सध्या त्यांचे उपचार सुरू आहेत आणि कुटुंबीय त्यांच्या तब्येतीला प्राधान्य देत आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sharad Pawar
Maharashtra Politics
Political News