SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

App Base वाहन सेवा अधिक सुरक्षित, परवडणारी होणार; फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक! नेमके काय आदेश दिलेत एकदा वाचाच

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आठावा बैठकीमध्ये अ‍ॅप आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासंदर्भात काही सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 30, 2026, 12:59 PM IST | Updated: Oct 30, 2026, 01:13 PM IST
Image Credit: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक (प्रातिनिधिक फोटो सौजन्य: रॉयटर्स, सोशल मीडियावरुन साभार)
Join

अ‍ॅप्लिकेशनवर आधारित प्रवासी वाहतूक सेवेसंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅप आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे. यासंदर्भात एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या एकाच अ‍ॅपवर उबर, रॅपिडो, भारत टॅक्सी या अ‍ॅग्रीगेटर कंपन्या, तसेच टॅक्सी आदी वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे यावर अ‍ॅप एआयचाही वापर केला जाणार असून तसा सल्ला मुख्यमंत्र्यांनीच दिला आहे.

एआयची आवश्यकता

या अ‍ॅपला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड दिली जावी अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत. वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी यात एआयची आवश्यकता असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अ‍ॅग्रीगेटर क्षेत्राचा आढावा

महाराष्ट्र अ‍ॅग्रीगेटर नियमावली संदर्भात झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी अ‍ॅग्रीगेटर क्षेत्राचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने अ‍ॅग्रीगेटर क्षेत्रात वाढती वाहन संख्या, टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.

समान संधी मिळावी

अ‍ॅप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवासी दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.

प्रवाशांना होणार फायदा

या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांचा फायदा होणार असून प्रवाशांना वाजवी दरात प्रवास करता येणार आहे. तसेच सर्व टॅक्सी चालकांना समान संधी मिळून पारदर्शक पद्धतीने राइड्सचे वाटप होईल, असं सांगितलं जात आहे. याच माध्यमातून मुंबईत 'मुंबई वन' अ‍ॅपच्या माध्यमातूनही टॅक्सी, रिक्षा आणि इतर सेवा बुक करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. याबद्दलही काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्मची विशेष गोष्ट म्हणजे यावर नोंदणीकृत सर्व चालकांना पोलीस पडताळणी बंधनकारक असेल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES