• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /26/11 हल्ल्याला 18 वर्षे झाली तरी अजून नाही मिळाली कसाबच्या वकिलांना फी; अजूनही पाहतायत वाट!

26/11 हल्ल्याला 18 वर्षे झाली तरी अजून नाही मिळाली कसाबच्या वकिलांना फी; अजूनही पाहतायत वाट!

26/11 मुंबई हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना अजमल कसाबची बाजू मांडणारे वकील अमीन सोलकर आणि फरहाना शाह यांचे मानधन अद्याप थकित असल्याची माहिती समोर आली आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 25, 2026, 22:22 IST|Updated: Nov 25, 2026, 22:36 IST
joinshare
26/11 हल्ल्याला 18 वर्षे झाली तरी अजून नाही मिळाली कसाबच्या वकिलांना फी; अजूनही पाहतायत वाट!
Image Credit: कसाबच्या वकिलांचे मानधन

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
सोनं 64 हजार तर चांदी 2.82 लाखांनी सस्त; 2026 सर्वात मोठी घरसण, सोनं चांदीचे इतके कमी रेट पाहून शॉक व्हाल

सोनं 64 हजार तर चांदी 2.82 लाखांनी सस्त; 2026 सर्वात मोठी घरसण, सोनं चांदीचे इतके कमी रेट पाहून शॉक व्हाल

2

26/11 हल्ल्याला 18 वर्षे झाली तरी अजून नाही मिळाली कसाबच्या वकिलांना फी; अजूनही पाहतायत वाट!

3

जळगावच्या कुटुंबातील 6 जणांना गुजरातच्या कालव्यात फेकले, मृतांबाबत अत्यंत धक्कायक माहिती उघड; पोलिसही हादरले

4

पुण्यातील गँगस्टर पिस्तुले कुठून खरेदी करतात? गुंडाच्या टोळीत पोरं कशी भरती करतात? UP, बिहारपेक्षा डेंजर स्टोरी

5

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीत टर्निग पॉइंट; कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला यंदा 18 वर्षे पूर्ण होत असताना, दहशतवादी अजमल कसाबची मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांची फी अद्याप थकित असल्याची बाब समोर आली आहे. अ‍ॅड. अमीन सोलकर आणि अ‍ॅड. फरहाना शाह यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेविरोधातील अपीलात सुमारे नऊ महिने युक्तिवाद केला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून नियुक्ती होऊनही त्यांचे मानधन मिळाले नसल्याचे या दोन्ही वकिलांचे म्हणणे आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.  

कसाबची बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांचे मानधन रखडले

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याला कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतर अ‍ॅड. अमीन सोलकर आणि अ‍ॅड. फरहाना शाह यांनी कसाबची बाजू मांडली. मात्र, इतकी वर्षे उलटूनही या कामाचे मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

2010 मध्ये नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही वकिलांची नावे निश्चित केली होती. त्यानंतर 8 जून 2010 रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने अधिसूचना काढून त्यांची नियुक्ती केली. कसाबच्या फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाची सुनावणी आणि त्याच्या अपीलात बचाव पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. उच्च न्यायालयात जवळपास नऊ महिने या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

किती मानधन अपेक्षित?

नियुक्तीच्या अधिसूचनेनुसार, अमीन सोलकर यांना विशेष सरकारी वकिलांच्या मानधनाच्या धर्तीवर, तर फरहाना शाह यांना फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाच्या प्रकरणात काम करणाऱ्या अतिरिक्त सरकारी वकिलांच्या धर्तीवर मानधन देण्याचे ठरले होते. उपलब्ध माहितीनुसार, हे मानधन दिवसाला साधारण 1500 ते 2000 रुपये इतके होते.

नोंदी सादर करण्याची मागणी

मानधनासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही. प्राधिकरणाकडून न्यायालयात कोणत्या तारखांना आणि किती तास उपस्थित होते, याची तपशीलवार बिले व नोंदी मागितल्या जात आहेत, असे दोन्ही वकिलांचे म्हणणे आहे. इतक्या वर्षांनंतर प्रत्येक दिवसाचा तपशील उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मानधन मंजूर करण्यासाठी नियमानुसार बिले आणि मेमो सादर करणे आवश्यक आहे, असे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या म्हणणे आहे.

कसाबला 2012 मध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी

मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2011 मध्ये कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली. विशेष न्यायालयात कसाबची बाजू मांडणारे अ‍ॅड. अब्बास काझमी यांनी मात्र आपले मानधन सरकारकडून वेळेत मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातील अपीलासाठी नियुक्त केलेल्या वकिलांचे मानधन अद्याप का रखडले?, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
Marathi News