SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; तीन महिने मोफत धान्य मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका, वाचा 14 निर्णय

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मोफत धान्य दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 15:59 IST | Updated: Nov 25, 2026, 16:06 IST
Image Credit: राज्य मंत्रिमंडळाचे 14 महत्त्वाचे निर्णय
Join

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मोफत धान्य दिलं जाणार आहे. 33 जिल्हयातील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. प्रतिमाणसी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू या प्रमाणात धान्य मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बैठकीत अजून 13 निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबद्दल जाणून घ्या

मंत्रिमंडळ निर्णय

1) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्य्र रेषेखालील – डिबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्हयातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य मिळणार. माणशी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू या प्रमाणात धान्य मिळणार ( अन्न व नागरी पुरवठा विभाग)

2) नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन. यामाध्यमातून परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टरला सिंचनाचा लाभ तसेच ११.५० मे.वॅ. वीज निर्मिती होणार. (जलसंपदा विभाग)

3) आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रीया जलद होणार. त्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापनेबाबत, व नव्वद दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा. त्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.(गृह विभाग)

4) महसूल विभागांतील अर्धन्यायिक कामकाजाकरिता महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्ह्यन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम) लागू करण्यात येणार. तसेच या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक जिल्हा एक अपील तरतूद लागू होणार. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी ( महसूल विभाग)

5) आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्लूएस)  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार. भोजन, निवास, निर्वाह भत्त्यात भरीव वाढ. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

6) शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देणार. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थाच्या माध्यमातून वित्तीय सुविधा उपलब्ध होणार. (शालेय शिक्षण विभाग)

7) महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. याबाबतचे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यास मंजुरी. या सुधारणेमुळे अभिनिर्णय फी, अपील भी यांच्या दरामध्ये सूसुत्रता येणार ( महसूल विभाग)

8) कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ), रामटेक अधिनियम, १९९७ आणि  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल व लेखे यांच्या संदर्भातील परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणा करणार. (उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)

9) खाजगी अनुदानित शाळांच्या विनियमनांसाठी सर्वसमावेशक असा कायदा होणार. त्यासाठी महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ या विधेयकाच्या प्रारुपास मंजुरी. विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी. (शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग)

10) महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. ( कामगार विभाग)

11) राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ (एनसीएएचपी कायदा, २०२१) मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यात येणार. याबाबतच्या आवश्यक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

12) शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महावि‌द्यालयामधील पूर्ण वेळ ग्रंथपालाप्रमाणेच आता खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी महावि‌द्यालयातील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग. वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सुधारीत वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

13) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिनियमातील तरतुदीसाठीच्या सुधारणेस मान्यता. त्याबाबतचा सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी. (सामान्य प्रशासन विभाग)

14) नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मान्यता. नगर पंचायतीसाठी प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES