रात्री 12 वाजता एकनाथ शिंदे टायगर श्रॉफच्या घरी पोहोचले! टायगरच्या भेटीनंतर म्हणाले, 'संपूर्ण परिवार सध्या...'
मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क मैदानाजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यामुळेच एकच खळबळ उडाली असून या हल्ल्यात टायगरसहीत तीन जण जखमी झाले आहेत. सदर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे टायगरची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर रविवारी संध्याकाळी अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यातून सुदैवाने सुखरूप बचावलेल्या टायगरला भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिंदेंनी टायगरच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्याच्या कुटुंबियांना धीर देत त्यांनी त्यांना सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले.
कुटुंब दहशतीखाली
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, "अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी असून, या हल्ल्यामध्ये तो सुदैवाने वाचला आहे," असे सांगितले. या हल्ल्यानंतर त्याचा संपूर्ण परिवार सध्या दहशतीखाली आणि चिंतेत आहे. या घटनेनंतर आपण स्वतः त्याची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शिंदे यांनी सांगितले. रात्री बारा वाजता शिंदे टायगरची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके
मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री शिंदेंनी टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाची सुरक्षा ही सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे, असे सांगत मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही शिंदेंनी दिला. टायगरवर हल्ला झाल्यानंतर नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी, टायगर श्रॉफवरील फायरिंगची घटना अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. या घटनेची मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. फायरिंग करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढले जाईल आणि कायद्याच्या चौकटीत त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ते दिवस मुंबईत पुन्हा येणार नाहीत
मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री शिंदेंनी टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाची सुरक्षा ही सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे, असे सांगत मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही शिंदेंनी दिला. टायगरवर हल्ला झाल्यानंतर नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी, टायगर श्रॉफवरील फायरिंगची घटना अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. या घटनेची मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. फायरिंग करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढले जाईल आणि कायद्याच्या चौकटीत त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रात्री उशीरा अभिनेत्री दिशा पटानीनेही टायगरची घरी जाऊन चौकशी केली.
...तर त्यांना त्याच पद्धतीने कठोरपणे रोखले जाईल
विशेष म्हणजे, घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरमधूनच टायगर श्रॉफशी तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशीही संवाद साधला होता. दोघांनाही चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी दिला. मुंबईने नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर गँगवॉरचा काळ अनुभवला आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांनी गँगवॉरचा बंदोबस्त करून कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणली. आता पुन्हा कोणी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्याच पद्धतीने कठोरपणे रोखले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
प्रत्येक नागरिकाची सुरक्षा
मुंबई सुरक्षित ठेवणे आणि मुंबईकरांच्या मनातील सुरक्षिततेची भावना कायम ठेवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. गँग कोणतीही असो, व्यक्ती कोणतीही असो; दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकार आणि मुंबई पोलीस सोडणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबतही आवश्यक ती काळजी घेतली जाईल. मात्र सुरक्षा ही केवळ प्रसिद्ध व्यक्तींपुरती मर्यादित नसून मुंबईतील प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे धमकी, दहशत किंवा दादागिरीच्या माध्यमातून कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला पोलिसांकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.