• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांना दिले आदेश, 'जे तालुके समाविष्ट नाहीत...'

265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांना दिले आदेश, 'जे तालुके समाविष्ट नाहीत...'

दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Sep 29, 2026, 03:14 PM IST|Updated: Sep 29, 2026, 03:22 PM IST
joinshare
265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांना दिले आदेश, 'जे तालुके समाविष्ट नाहीत...'

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, देवेंद्र फडणवीस यांनी 256 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने शनिवारी 26 सप्टेंबर रोजी यासंदर्भातील जीआर काढला. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ असून,75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. दरम्यान दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमिती बैठक नियमित घ्या, मंत्र्यांनी आपल्या सूचना नियमितपणे या उपसमितीकडे द्याव्य असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जे तालुके समाविष्ट झालेले नाहीत, त्याबाबत अन्य निकष लावून मदतीबाबत प्रस्ताव सादर करावा असंही त्यांनी सांगितलं आहे.  पाणीवापर कसा करायचा याचा स्वयंस्पष्ट जीआर काढा, पिण्याचे पाणी गृहीत धरताना त्यात जनावरांचे पाणी समाविष्ट करा आणि नंतर इतर प्राधान्यक्रम ठरवा असंही त्यांनी सांगितलं आहे.


डीपीडीसीमध्ये अधिकाधिक कामे ही दुष्काळ निवारणाची घ्या. पालकमंत्र्यांनी कल्पकतेने स्थानिक स्तरावर काय निर्णय घेता येईल, यावर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षा शुल्क घेऊन रिफंड करण्यापेक्षा आधीच घेऊ नका असेही आदेश त्यांनी दिले आहेत.


बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "दुष्काळाबाबत आज मंत्रीमंडळात चर्चा झाली. अनेक मंत्र्यांनी तालुके पिक करपले तरी ट्रिगर 1 मध्ये बसलेले नाहीत,. त्यांनाही मदत करण्याची मागणी केली. असे जे तालुके आहेत तिथे ट्रिगर 2 मधील काही निकष आणि त्यातही बसत नसतील त्या तिथे ग्राउंड पाहणी करून दुष्काळाचे फायदे द्यायचे अशी कार्यप्रणाली ठरवली आहे. उपसमितीलाही तालुक्यातील स्थिती जाणून घेतली पाहिजे असं सांगितलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे पण तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मदतीपासून वंचित राहू नये. उपसमिती यावर लक्ष ठेवेल. यामुळे शेतकरी, तालुक्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळेल. मंडळ स्तरावरही तालुक्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे".

अग्निवीर यांच्यासंदर्भात ते म्हणाले की, पहिली बॅच आज परत येणार आहेत. पोलीस किंवा वेगवगेळी पदे आहेत त्या पदावर आपण अग्निवीरांना सामावून घेणार आहोत. आपण त्यांना वयातही चार वर्षाची सुट देणार आहोत. पदे कमी पडली तर आणखी पदे भरले जातील . विशेष बाब म्हणून कोस्टल सिक्युरिटी म्हणून आपण त्याना आपण घेणार आहोत. सर्व अग्निवीरना आम्ही घेणार आहोत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Devendra Fadnavis