देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. या चर्चेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्च रंगली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्रात नुकतेच पदवीधर निवडणूकांचे निकाला जाहीर झाले आहेत. पदवीधर निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे मोठ्या राजकीय घडामोड घडत आहेत. तर, दुसरीकडे कर्जत भीमाशंकरच्या जंगल तोडीवरुन ठाकरे बंधू सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. ठाकरे बंधू थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत. अशात ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार अशी चर्चा रगंली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे तिनही नेते एकत्र आले. मात्र, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या तिघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही.
महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित राहिले. भाजपने नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते. मंचावर देखील हे तिनही नेते एकमेकांसोबत चर्चा करताना दिसले. व्यायपीठावर देखील ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद सुरु होता.