SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जेलमधून काढून नागडा करुन मारला पाहिजे; लॉरेन्स बिष्णोईवरील प्रश्नावर राज ठाकरे स्पष्टच बोलले, भाजपाला म्हणाले 'तुम्ही पोसत असल्याने...'

लॉरेन्स बिष्णोईने टायगर श्रॉफवर केलेल्या हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. तुम्ही पोसत असल्याने यांना भिती वाटत नाही अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 21, 2026, 06:17 PM IST | Updated: Oct 21, 2026, 06:26 PM IST
Image Credit: लॉरेन्स बिष्णोईवरील प्रश्नावर राज ठाकरे स्पष्टच बोलले, भाजपाला म्हणाले 'तुम्ही पोसत असल्याने...'
Join

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावरुन भाजपावर टीका केली आहे.  हीच परिस्थिती भाजपा विरोधात असताना झाली असती, तर त्यांनी काय केलं असतं? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

लॉरेन्स बिष्णोई साबरमतीमधील जेलमध्ये आहे असं सांगत प्रश्न विचारलं असता राज ठाकरेंनी, मला 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल' हे गाणे मला आठवते असं म्हटलं. पुढे ते म्हणाले, "हीच परिस्थिती भाजपा विरोधात असताना झाली असती, तर त्यांनी काय केलं असतं? काय बोलले असते? सत्तेत असताना आणि विरोधात असताना वेगळी भूमिका असं कसं चालेल? छातीठोकपणे आम्ही केलं सांगितलं जात असताना, बंदोबस्त करता येत नाही का? जेलमधून काढून नागडा करुन मारला पाहिजे. तुम्ही पोसत असल्याने यांना भिती वाटत नाही. अन्यथा यांची हिंमत कशी होईल?".
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES