SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 29, 2026, 09:33 PM IST | Updated: Oct 29, 2026, 10:01 PM IST
Image Credit: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हजेरी
Join

महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र नंतर राज ठाकरे यांनीच आपल्या भाषणात यामागील कारण सांगितलं. काही व्यासपीठं अशी असतात ज्यावेळी राजकीय मतभेद गाडून, सोडून त्या व्यासपीठावर एकत्र यावं लागतं असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्याही मारल्या, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला.

"आज एकमेकांवर टीका करणारे, भांडणारे एका व्यासपीठावर कसे आले असा प्रश्न असेल. काही व्यासपीठं अशी असतात ज्यावेळी राजकीय मतभेद गाडून, सोडून त्या व्यासपीठावर एकत्र यावं लागतं. ते व्यासपीठ कलेचं असतं, संगीताचं असतं, कधी लग्नाचं असतं. अशा प्रकारचे मतभेद, टीका करत असले तरी अशा प्रसंगी या गोष्टी बाजूला सारुन व्यासपीठावर येणं ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे," असं त्यांनी म्हटलं.

राज ठाकरेंनी यावेळी व्यंगचित्रांचं दालन उभं राहिलं पाहिजे असं मत मांडलं. देशात इतकी राज्यं नाहीत जिथे इतके व्यंगचित्रकार होऊन गेले आणि होत आहेत. ही परंपरा पुढे नेण्यासाठी शासनाने माझी गरज लागल्यास सांगावं. तसंच चित्रकार, शिल्पकारांचं दालनही होणं गरजेच आहे असं ते म्हणाले आहेत.

2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं

"मी मुख्यमत्र्यांनी बोलावंलं की ते येतात असं आशिष शेलार म्हणाले. मी बोलवत जाईन ते येत जातील असं त्यांचं म्हणणं आहे. 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, अजून काय सांगू," असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीही आपण 2019 च्या आधी उद्धव ठाकरेंनाही जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा ते आले, पण त्यानंतर ते आले नाहीत असं मिश्किलपणे म्हटलं.

पदवीधर निवडणुकीवरुन टोला

व्यंगचित्र माझी आवडती गोष्ट होती, जे जेमध्ये तीन वर्ष घालवली त्यानंतर बाहेर पडलो, त्यामुळे मी पदवीधर नाही, पण निवडणुकीला उभा राहू शकतो. पदवीधरसाठी पदवीधर लागतो असं नाही. या देसात जी लोकशाही आहे ना असं ते उपहासात्मकपणे म्हणाले. मला एकदा उमेदवाराचा  फॉर्म दाखवला होता, त्यात खाली सही किंवा अंगठा लिहिलं होतं. ते फॉर्म हेच व्यंगचित्र होतं असा टोला त्यांनी लगावला. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES