SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नणंदेच्या घरी धुणी-भांडी करायला सांगितल्याने सासरच्यांविरुद्ध पोलिस तक्रार, कोर्टाचा सुनेलाच दणका; हा निकाल एकदा वाचाच

या प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेने सासू, सासरे, नणंद व दिराविरोधात कौटुंबिक हिंसाचारासह अन्य कलमांतर्गत पोलिसांत तक्रार केली होती. नेमकं झालेलं काय? महिलेचं म्हणणं काय होतं? कोर्टाने काय निकाल दिला? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 14, 2026, 09:47 AM IST | Updated: Oct 14, 2026, 10:04 AM IST
Image Credit: न्यायालयाने या प्रकरणात महिलेला दणका दिलाय (प्रातिनिधिक फोटो)
Join

उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. विवाहितेला धुणी-भांडी करायला सांगणे ही कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत क्रूरता ठरू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. हा निकाल देताना न्यायालयाने सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात...

नक्की झालं काय?

या प्रकरणामधील तक्रारदार महिलेने केलेल्या दाव्यानुसार, पती एकदा तिला नणंदेकडे घेऊन गेला होता. तेथे तिला धुणी-भांडी करायला सांगितले. ही क्रूरता आहे, असा आरोप करत या महिलेने महिलेने सासू, सासरे, नणंद व दिराविरोधात कौटुंबिक हिंसाचारासह अन्य कलमांतर्गत पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या सर्वांनी याचिका दाखल केली होती.

तक्रारदार महिलेचं म्हणणं काय?

विवाहितेला धुणी-भांडी करायला सांगणे ही कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत क्रूरता ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द केला. न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मला बाळ होत नसल्याने सासरचे मला सतत टोमणे मारायचे. पतीने मला घटस्फोट द्यावा असं ते पतीला वारंवार सांगत होते. ही देखील क्रूरता आहे. तेव्हा हा गुन्हा रद्द करू नये, अशी विनंती महिलेने केली.

सासरच्यांनी असं काय सांगितलं की ते निर्दोष सुटले?

मात्र आम्ही सुनेसोबत राहत नाही. तेव्हा तिने केलेले आरोप निराधार आहेत, असा दावा सासरच्यांनी केला. हा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. नणंदेच्या घरात विवाहितेला धुणी-भांडी करायला सांगितले गेले हे सत्य असले तरी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत ही क्रूरता ठरू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सत्यता तपासणे गरजेचं

विवाहितेने सोबत न राहणाऱ्या सासरच्या मंडळींवर आरोप केल्यास त्याची सत्यता काळजीपूर्वक तपासायला हवी. या प्रकरणातील सासू, सासरे, नणंद व दीर हे या विवाहितेसोबत राहत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवणे कायद्याची अवहेलना ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणामधील चौघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES