SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबई ते अलिबाग 2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; 70 KM अंतर डायरेक्ट 50 Km ने कमी करणारा सागरी मार्ग

मुंबई ते अलिबाग हा 2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग बांधला जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 25, 2026, 23:37 IST | Updated: Nov 25, 2026, 23:40 IST
Join

Mumbai To Alibaugh In 10 Min Revas Karanja Bridge : मुंबई ते अलिबाग प्रवासाकरिता दोन तास लागतात. मात्र, हाच  2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग  बांधला जात आहे.  या मार्गामुळे 70 KM अंतर डायरेक्ट 50 Km ने कमी होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर हा  मुंबई-अलिबाग एकूण प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे.

मुंबई-एमएमआर प्रदेशात वाहतूक सुलभ करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात लांब मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक ब्रिज उघडल्यानंतर, रायगड जिल्ह्यात किनारी संपर्क वाढवण्याचे काम आता सुरू आहे. धरमतरजवळील खाडीवर रेवस-करंजा पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर मुंबई ते अलिबाग प्रवास सपरफास्ट होणार आहे.  

2.04 किमी लांबीचा हा पुल आहे. सुरुवातीला एमएसआरडीसीने 2,079  कोटी रुपयांचा हा प्रकल्प सादर केला होता.   परंतु कालांतराने त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. या प्रकल्पाचा खर्च  3500 कोटी रुपायंवर पोहचला आहे. नोव्हेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठेवले आहे.   20.04 किमी लांबीच्या या पुलामुळे मुंबई अलिबागमधील अंतर  50 किमीने कमी होणार आहे.

मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी रस्तेमार्गे 120 KM चा प्रवास

रायगड जिल्ह्यातील किनारी शहर असलेल्या अलिबागला जाण्यासाठी मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अंदाजे 120 किमी रस्त्याने प्रवास करावा लागतो. रेवस आणि कारंजा दरम्यान 2.04 किमी लांबीच्या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, मुंबईहून एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे अलिबागचे अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.

सध्या, रेवस आणि कारंजा दरम्यान सुमारे 70 किमी अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, रेवसहून करंजा येथे फक्त 10 मिनिटांत पोहोचता येते. सध्या रेवस आणि कारंजा दरम्यान फेरी सेवा चालतात, परंतु त्यामध्ये चारचाकी वाहने बसत नाहीत. पावसाळ्यात, खराब हवामानामुळे फेरी सेवा विस्कळीत होतात. 

अलिबाग ते जेएनपीटी दरम्यानचे अंतर 25 किमीने कमी होणार आहे. एकदा समुद्री पूल रेवस आणि कारंजा यांना जोडला की, अलिबागहून जेएनपीटीला सहज पोहोचता येईल. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागमधील रस्ते अंतर अंदाजे 55 किमीवरून फक्त 30 किमीपर्यंत कमी होईल. याव्यतिरिक्त, नियमित वाहनचालकांना मुंबई आणि अलिबागमधील जड वाहतुकीपासून मुक्तता मिळेल. सध्या, मुंबईहून अलिबागला थेट प्रवास करण्यासाठी रो-रो सेवा उपलब्ध आहेत, परंतु त्या खूप महाग आहेत. 

रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक 4 वर हा चार पदरी पूल बांधला जात आहे. 29.50 मीटर रुंदीच्या या पुलावर वाहने ताशी 80  किमी वेगाने प्रवास करू शकतील. त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड बांधला जाईल, तर रेवसमध्ये 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता स्टिल्टवर बांधला जाईल. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES