SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'नाही नाही नाही, आम्हाला अर्थखातंच पाहिजे'; मुख्यमंत्री भेटीनंतर छगन भुजबळ स्पष्टच बोलले; ‘आता बरेच दिवस झाले, आमचं...’

आम्हाला अर्थखातंच हवं असून, आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 25, 2026, 11:57 AM IST | Updated: Oct 25, 2026, 12:21 PM IST
Image Credit: आम्हाला अर्थखातंच हवं, भुजबळांची भूमिका
Join

आम्हाला अर्थखातं सोडून दुसरं कोणतंही खातं नको अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती दिली. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. आम्हाला अर्थ खातंच हवं असून, हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्हाला खातं मिळेल असं वाटतं असं ते म्हणाले आहेत. तसंच विलिनिकरणाची कोणतीही चर्चा नसून हे वृत्त त्यांनी फेटाळून लावलं आहे.

"आता बरेच दिवस झाले असून, आमचं अर्थखातं जे त्यांनी द्यायला हवं ते लवकरात लवकर दिलं पाहिजे. कारण यासंदर्भात चर्चा होत असून, हे योग्य नाही. यांसदर्भात ते (मुख्यमंत्री) सकारात्मक होते. सध्या दुष्काळ, निधीची जुळवाजुळव सुरु असून ते झाल्यावर ते देऊ असं त्यांनी सांगितलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे खातं मिळेल अशी आशा आहे," असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दिल्लीतील वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांना आणि ताईंना स्वातंत्र्य निर्णयाचं दिलं आहे. यामुळे त्यांची काही आडकाठी नाही असंही ते म्हणाले आहेत.  यावेळी त्यांना भाजपाने अर्थखातं ठेवून इतर खातं दिल्यास असा प्रश्न विचारला असता त्यांनी, नाही, नाही नाही, आम्हाला अर्थखातंच पाहिजे असं स्पष्ट केलं.

"शेतकऱ्यांना फार मोठे निधी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. कर्जमुक्ती योजनाही सुरु आहे.  मोठी रक्कम तयार करावी लागणार आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी लागणार असल्याने थोडा वेळ लागेल. मंत्रीपदं रिकामी आहेत त्यासंदर्भात एकत्रित निर्णय होईल. मंत्रिमंडळ विस्ताचारा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे," असं ते म्हणाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तारीख सांगा अशी मागणी करु शकत नाही असं सांगत त्यांनी खातं नेमकं कधी मिळेल हे सांगण्यास नकार दिला.

"पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले आणि विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली असा कोणताही विषय अजेंड्यावर नव्हता आणि नाही. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्री बदलणार असंही नाही. त्याची थोडीही चर्चा झालेली नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES