SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आणखी एक चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्रात हवामान फिरणार; आज 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळं आणखी एक चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 01, 2026, 08:00 AM IST | Updated: Nov 01, 2026, 08:02 AM IST
Image Credit: New Cyclone Threat Emerges in Bay of Bengal
Join

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येतोय. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात होणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी ओडिशा येथे अर्णब चक्रीवादळ धडकले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात 'मुरासू' चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.  हे चक्रीवादळ 2 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता आहे. 'मुरासू'चा अर्थ नगारा असा आहे. 1 नोव्हेंबरला त्याची तीव्रता आणखी वाढून चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज पूर्व विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गेल्या सहा तासांत ही प्रणाली ताशी 30 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. सध्या हे क्षेत्र चेन्नईपासून सुमारे 960 किलोमीटर, विशाखापट्टणमपासून 980 किलोमीटर, मच्छलीपट्टणमपासून 1 हजार 30 किलोमीटर आणि ओंगोलपासून 1 हजार 80 किलोमीटर अंतरावर आहे. मंगळवारी पहाटे हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी नेल्लोर ते नरसापूरमदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे तीव्र चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवस दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (APSDMA) व्यवस्थापकीय संचालक प्रखर जैन यांनी केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES