• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर, इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या आजच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर, इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या आजच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

LPG Gas Cylinder Rates : 1 नोव्हेंबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तेव्हा आजच्या ताज्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 01, 2026, 09:10 AM IST|Updated: Nov 01, 2026, 09:35 AM IST
joinshare
दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर, इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या आजच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती
Image Credit: दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा 'गुन्हा'; पुणे पोलीस दलातील पोलिसाचा कारनामामुळे खळबळ, असं फुटलं बिंग

आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा 'गुन्हा'; पुणे पोलीस दलातील पोलिसाचा कारनामामुळे खळबळ, असं फुटलं बिंग

2

गुप्तांगाच्या भागात 3 जखमा, अंतर्वस्त्र काढले अन्..., ठाणे पोलिसांवर आरोप करणाऱ्या तरुणाचा धक्कादायक VIDEO समोर

3

दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर, इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या आजच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

4

मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती

5

आणखी एक चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्रात हवामान फिरणार; आज 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

LPG Gas Cylinder Rates : दिवाळी सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे घरोघरी फराळ बनवण्याचं काम जोरात सुरु आहे. तर हॉटेल आणि मिठाई दुकानदार सुद्धा सणासुदीनिमित्त खाद्यपदार्थांची निर्मिती करत आहेत. अशातच आता 1 नोव्हेंबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 10 ते 11.50 रुपये वाढ झालेली आहे. तर सणासुदीच्या निमित्ताने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झालेली नाही. सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती जाहीर केल्या आहेत.

दिल्लीतील व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती :

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,820 रुपये झाली आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात याची किंमत 2,810 रुपये होती. याचा अर्थ असा की, दिल्लीत हा सिलिंडर 10 रुपयांनी महाग झाला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत ही किंमत 62.50  रुपयांनी वाढवण्यात आली होती. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता.

चेन्नईत सर्वात जास्त वाढल्या किंमती :

चेन्नईमध्ये, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ₹2,983 वरून वाढून ₹2,994.50 झाली आहे. म्हणजेच यात ₹11.50 ची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ₹957.50 इतकीच कायम आहे.

हेही वाचा : मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती

मुंबईमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती :

मुंबईमध्ये 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2,764 रुपयांची वाढ झाली आहे. येथे घरगुती सिलिंडरची किंमत 941.50 रुपयांवर स्थिर आहे. अहमदाबादमध्ये, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2,831.50 रुपयांवरून वाढून 2,842 रुपये झाली आहे. म्हणजेच यात 10.50  रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरची किंमत 949 रुपयांवर कायम आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Petrol Price
Diesel Price
Marathi News
Mumbai News