SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

लॉरेन्स बिश्नोईला अमित शाह देतात संरक्षण, टायगरवरील हल्ल्यानंतर राऊतांचा खळबळजनक आरोप; 'साबरमतीतून त्याला...'

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी बिन्नोई टोळीनं घेतली असून यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी थेट केंद्रीय आणि राज्यातील गृहमंत्र्यांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 19, 2026, 12:21 PM IST | Updated: Oct 19, 2026, 12:43 PM IST
Image Credit: राऊतांनी केला गंभीर आरोप (प्रातिनिधिक फोटो)
Join

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई टोळी पुन्हा चर्चेत आलेली असतानाच आता बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख करत राज्यसभेचे खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे. "शाहांसारखा माफिया गृहमंत्री अतिरेकी पोसतो व राज्य करतो," अशी घणाघाती टीकाराऊत यांनी अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात बोलताना केली आहे. तसेच पत्रकांशी संवाद साधत पुढे बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. "फडणवीस सभ्य असतील तर त्यांनी यांच्या बाजूने बोलू नये," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

यावर फडणवीस बोलणार का?

लॉरेन्स बिश्नोईची टोळीने टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेतल्याच्या संदर्भातून प्रसार माध्यम प्रतिनिधींनी राऊत यांना प्रश्न केला असता त्यांनी, "अनेक राज्यांत ही टोळी सक्रिय. साबरमतीतून त्याला बाहेर काढत नाहीत अमित शाह. संरक्षण देतात अमित शाह त्याला," अशी टीका केली. "त्यांना (बिश्नोई टोळीला) अमित शाह संरक्षण देत आहेत.  त्यावर देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत का?" असा सवाल राऊत यांनी केला आहे.

लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना

एवढ्यावरच न थांबता राऊत यांनी सूचक विधान करत, "इथं ही वेगळे बिश्नोई पाळलेत. पुर्णेकर हत्येनंतर फडणवीसांनी वेळ लावला. दुसरं प्रकरण असतं तर अटका झाल्या असत्या," असंही म्हटलं आहे. तसेच बिश्नोई तुरुंगातून व्हिडीओ करतो यावर बोलताना, "लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना," असं राऊत म्हणाले. "मुंबईत बिल्डरराज कसा सुरु आहे यावर मी पत्र लिहिलंय. बिल्डर लॉबी कशी काम सुरु आहे ते मी सांगितलं आहे," असा उल्लेख राऊत यांनी केलाय.

जंगल रेझिम संपवणार

"मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झाला आहे," अशी टीकाही राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना केली. महायुतीच्या सरकारच्या कारभारावर निशाणा साधताना, "गँगवॉर, धमक्या, खंडणी हा 90 चा काळ पुन्हा एकदा फडणवीस-शिंदे-पवार यांच्या काळात पाहायला मिळतोय," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "ही जंगल रेझिम (राजवट) उलथवणार," असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

लॉरेन्स बिश्नोई आता आहे कुठे?

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा ऑगस्ट 2023 पासून गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती तुरुंगात आहे. पूर्वी त्याला दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र 2023 मध्ये ड्रग्ज तस्करीच्या एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याचा ताबा घेतला आणि त्यानंतर त्याची रवानगी साबरमती तुरुंगात करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला इतर कोणत्याही राज्यात नेण्यास किंवा न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES