SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत; संजय राऊतांचा दसरा मेळाव्यात खळबळजक आरोप

लॉरेन्स बिष्णोई अस्तित्वात नाही. अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. दसरा मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीकेची तोफ डागली.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 08:09 PM IST | Updated: Oct 20, 2026, 08:44 PM IST
Image Credit: अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत, संजय राऊतांची टीका
Join

लॉरेन्स बिष्णोई अस्तित्वात नाही. अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. दसरा मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीकेची तोफ डागली. शस्त्र देवाच्या हाती आहे, पण मुंबईत ते गुंडांच्या हाती गेलं आहे. त्यांचे सरदार अमित शाह, देवेंद्र फडणवीस आहेत. मुंबईत रोज कायदा सुव्यवस्थेचा मुदडा पडत आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली. तसंच जर लोकांना संरक्षण हवं असेल तर शिवसेना हेच एकमेव शस्त्र आहे असं म्हटलं. या देशातील माफियांची टोळी कोणी चालवत असेल तर ते अमित शाह आहेत. म्हणून आम्हाला ही सत्ता बदलायची आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. 
 

"आपल्याला मुंबईतील अंडरवर्ल्डविषयी फार माहिती आहे. त्यामुळे कधी कोण हत्यार काढेल आणि चालवेल याची आम्हालाही माहिती असते. लॉरेन्स विष्णोई अस्तिवात नाही. अमित शाह हेच लॉरेन्स बिण्णोई आहेत. या देशाचा गृहमंत्री ज्यांच्यावर या देशाच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, ते एक माफिया आहेत. बिष्णोईचं नाव आहे, पण या देशातील गुंड, माफियांची टोळी कोणी चालवत असेल तर गुजरातेच अमित शाहे हेच बिष्णोई आहेत. म्हणून आम्हाला ही सत्ता बदलायची आहे," असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, "शस्त्र देवांच्या हाती आहे, पण मुंबईत ते गुंडांच्या हाती गेलं आहे. त्या गुंडांचे सरदार अमित शाह, देवेंद्र फडणवीस आहेत. मुंबईत रोज कायदा सुव्यवस्थेचा मुदडा पडत आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षा हवी असेल तर शिवसेना हेच एकमेव शस्त्र आहे. जो शिवसेनेचे नाव घेईल त्याचं संरक्षण होईल". 

शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंची आहे

"मला मगाशी कोणीतरी विचारलं की, आज दोन शिवसेनेचे मेळावे होत आहेत. मी शट अप म्हटलं. शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंची आहे. हा जो समोर दिसतोय, हा टिकाऊ माल आहे आणि विकाऊ माल तिकडे आहे. तिकडे काय अमित शाहांचा दांडिया आहे. ते दांडिया खेळत बसले असतील. विचार नाही, संघर्ष नाही. महाराष्ट्र, देश असेल, स्वाभिमान कोणती भूमिका नाही. विचार इक़डे आहे, महाराष्ट्रा धर्म इथे आहे," अशी टीका त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केला.

पुढील दसऱ्याला धनुष्यबाण असेल

"या शिवसेनेशी पंगा घेण्याचा प्रयत्न होऊन 60 वर्ष झाली. भले आले आणि गेले पण या व्यासपीठावरची गर्दी कमी झाली नाही. समोरही लाखोंच्या गर्दीला कधी ओहोटी लागली नाही. आज या मंचावर धनुष्यबाण नसेल, पण पुढील दसऱ्याला धनुष्यबाण असेल. भगवान रामाने सर्व सोडलं पण धनुष्यबाण कधीच सोडला नाही, आणि आम्हीही सोडणार नाही. आम्ही धर्मरक्षक आहोत. न्यायालयात ज्याप्रकारे खटला सुरु आहे, त्यावरुन पुढच्या दसऱ्याला तो आपला असेल याची खात्री आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"देशात सध्या जेन झीची लाट आली आहे. त्यांचं नाव घेतलं की मोदी, शाहांच्या बुडाला आग लागते. या जेन झीची डोकी फार चालतात. भाजपाच्या आयटी सेलने राहुल गांधींना पप्पू ठरण्यासाठी कोट्यवधी खर्च केले. पण या जेन झींनी एकही पैसा खर्च न करता 56 इंचका छोटा बंदर, बाल नरेंदर ठरवलं," अशी खिल्ली त्यांनी उडवली.

मोदी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाणार

"तुम्ही तरुणांना अंधभक्त केलं. काही प्रश्न विचारले तर जय श्रीराम बोला सांगतात. 10 वर्ष आम्ही बोललो, पण आता तुमचीय जायची वेळ आली आहे त्यामुळे हे राम बोला. हे सरकार कधी जाईल असं लोक विचारतात. मी त्यांना सांगतो की, नरेंद्र मोदींनी अयोध्येत प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त काढला होता. राम मंदिराची उभारणी झाली, पण मुहूर्त चुकला. राम मंदिर लुटलं गेलं, दरोडे पडले, अंलकार चोरीला गेले. ज्या अयोध्येसाटी आम्ही रक्त सांडलं, गोळ्या झेलल्या ते उभं राहिलं तेव्हा आतापर्यंत भाजपाच्या चोरांनी, डाकूंनी 1400 कोटींची लूट केली. सीसीटीव्ही बंद करुन दोनपेट्या चोरल्या. मी सांगतो, मोदी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाणार. मोदी तो गयो! ना मोदी राहणार, ना शाह," असा दावा त्यांनी केला. 
 

ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बंडाला सुरुवात

"पंतप्रधान राहतात तिथे 2 लाख सशस्त्र जवान आहेत. प्रधानमंत्री अंडरग्राऊंड आहेत, इतके घाबरले आहेत. अल्बेनियात सुप्रीम कोर्ट जाळलं. कारण भ्रष्ट पंतप्रधानांच्या पाठीशी सुप्रीम कोर्ट उभं राहिलं. इटली, फ्रान्स, बेल्जिअम आणि भारतातही लाखो लोक रस्त्यावर आहेत. आता मोदी शाह लोकांना घाबरत आहेत. विद्यार्थी, गरीब-मध्यमवर्गीय, शिक्षक, शेतकरी, महिला रस्त्यावर असताना यांना मत देतं कोण? त्यांना ते ग्यानू मत देत आहेत. हे भ्रष्ट सरकार आपल्याला उलथवावं लागेल. आता आम्ही कोणाकडे याचना करणार नाही. आता युद्ध होणार. आम्ही छातीवर गोळ्या झेलून पण तिरंगा फडकवण्यास विरोध कऱणाऱ्या सरकाराल तुरुंगात पाठवल्याशिवाय रहाणार नाही. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बंडाला सुरुवात झाली आहे. या बंडाचे सेनपाती उद्धव ठाकरे आहेत," असं ते अखेरीस म्हणाले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES