'... अन् तो बसला त्यांच्या डोक्यावर', अभिजीत दीपकेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर केली टीका, 'तिरंग्याबद्दल द्वेष अजूनही...'
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात अभिजीत दीपकेंचा उल्लेख करत मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.
शिवाजी पार्कावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून दुष्काळ असो किंवा टायगर श्रॉफवरील हल्ल्यावरून टीका केली आहे. केंद्र सरकारवरही उद्धव ठाकरेंनी ताशेरे ओढले आहेत.
उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात आहे. बिश्नोई साबरमतीमध्ये फाफडा आणि ढोकळा खात आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंम्मत असेल तर साबरमती जेलमधून इथे आणावं. मग गप्पा मारा आमच्याकडे. पण कोणाचे रक्त उकळत नाही. कोणला त्याचं काही वाटतं. महाराष्ट्रात साधू संत इतिहासीक, लेखक, रंगभूमी, तुम्ही सांगा, महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. पण माझ्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम, या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री करतो. महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हणताना जीभ झडत नाही का? मोदी आणि शहांनी 12 वर्ष देशाला छळलं आहे. आंदोलनाआधी पोलीस नोटीस पाठवत आहेत. आम्ही रेजीम चेंज करायला उभे आहोत. मुलांना घेऊन आईवडील आंदोलनात उतरले आहेत. मुलांचा आवाज समजून न घेतल्यास परिस्थिती वाईट होईल. तिरंगा रॅली काढणं गुन्हा आहे का? जंतरमंतरवर झेनजी गेले तेव्हा पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. 13 कोटी नागरिकांच्या मतदानाचा हक्क काढून घेतला आहे. कुणी रस्त्यावर उतरला तर तुम्ही त्याला गुंड ठरवता, असं ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात भाषण करताना अभिजीत दीपकेंबद्दली बोलले. ते म्हणाले की, ही जी सगळी मुलं रस्त्यावरती येत आहेत. कशासाठी येत आहेत. जो मोदींनी मुहूर्त काढला होता, तो कोणता काढला होता. अभिजीत...मग बरोबर ठरला तो. बसला दीपके त्यांच्या डोक्यावर. पण ही मुलं तिरंगा जाताना तुम्ही दिसला तर चल आत म्हणजे.. हा तुमचा तिरंगाच्या द्वेष. माझं भागवत आणि संघाशी काही भांडण नाहीय. पण मला आज विचारायचं आहे. तुमच्या वर जी काही टीका होते की, तुम्ही स्वातंत्र्यानंतर काही वर्ष तुमच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकवत नव्हता. तो द्वेष आजही कायम आहे का? आज सुद्धा तिरंगा यात्रा काढणे हा गुन्हा ठरत असेल मग लेके रहेंगे आझादी या शब्दाचा अर्थ नेमका कसा लावयचा भागवत साहेब तुम्ही मला सांगा. पण ही मुलं चवताळून रस्त्यावरती उतरलेत. पण काय नशीबच फुटकं आहे. या अभिजीत दीपके यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी-नऊ आणले आहेत. सीजेपीचे आंदोलन सुरू होते. त्या पहिल्या आंदोलनात मी अभिजीत दीपके आणि तरुण आंदोलकांची भेट घ्यायला गेलो होतो. तिथे कोणाचं डोकं फुटलं होतं, कोणाच्या अंगावर वळ होते. एक मुलगी होती, तिचे कपडे फाडलेले होते. त्यांच्या जखमा पाहून मी घरी जा असं बोललो. पण मेलो तरी बेहत्तर पण आता माघार नाही, असं त्यांनी सांगितले. मोदीजी, अमित शाह हे 12 वर्षांचं संचित आहे. तुम्ही 12 वर्ष देशाला छळलं आहे,’ असं ठाकरे म्हणाले.