SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'36 आमदार असतानाही तुम्ही...', पार्थ पवारांमुळे NCP मध्ये नाराजी; कोअर कमिटीच्या बैठकीत तक्रार?

दिल्लीत अमित शाहांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पार्थ आणि सुनेत्रा पवारांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 03, 2026, 07:48 AM IST | Updated: Nov 03, 2026, 08:00 AM IST
Image Credit: पार्थ पवारांमुळे NCP मध्ये नाराजी
Join

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच पक्षाच्या बड्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ , हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या नेत्यांचा बैठकीत समावेश होता. विशेष म्हणजे, मुंबईत सोमवारी पक्षाची बैठक असताना नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यानं या घडामोडींचं महत्त्व वाढलं. मात्र या महत्वपूर्ण भेटीवेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नव्हते.

अमित शाहांकडे पार्थ आणि सुनेत्रा पवारांची तक्रार?

दिल्लीत अमित शाहांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पार्थ आणि सुनेत्रा पवारांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षात वरिष्ठांना डावलून कारभार सुरू असल्याची तक्रार अमित शाहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता, युवती अध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय युवक प्रदेशाध्यक्ष ही पदं निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलल्याची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षात नाराजी

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षात नाराजी असून सर्वांना सोबत घेऊन काम करा अशी भूमिका नेत्यांनी मांडली आहे. पदनिवडीबाबत विश्वासात न घेतल्याची त्यांची भूमिका आहे.

झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केल्याने नाराजी

मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची निवड करताना किमान पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते मात्र परस्पर निवड करण्यात असल्याने नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून जेष्ट नेत्यांशी योग्य समन्वय साधून निर्णय घेतले जातील असं आश्वासन देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबईचे नेतृत्व एकूण 36 आमदार करतात या मुंबईच्या अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची निवड करता? असा सवाल वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत विचारला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

तटकरेंना फेटाळलं नाराजीचं वृत्त

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिलीय. आमच्यात नाराजीचं कोणतंही कारण नाही, असं तटकरे म्हणालेत. संघटनेतल्या नियुक्तीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही भावना मांडल्यात. अर्थखात्यावर निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या कामकामाजावर बैठकीत चर्चा झाल्याचंही तटकरे म्हणाले आहेत.  
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES