SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मोठी बातमी! नागपुरात रोहित पवारांची युवा नेत्यांसोबत बैठक, पवारांच्या निवृत्तच्या बातमीदरम्यान राष्ट्रवादीत खलबतं

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार आहे, या बातम्यादरम्यान रोहित पवारांनी नागपुरात युवा नेत्यांची बैठक घेतली.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 09:00 IST | Updated: Nov 25, 2026, 09:19 IST
Image Credit: Rohit Pawar
Join

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्व आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे लवकरच राजकारणातून निवृत्त होणार आहे, अशी बातमी एका वृत्तपत्रातून समोर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह देशातील राजकारणात अनेक चर्चा रंगल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार राजकारणातून दूर होती आणि त्यानंतर त्यांचा पक्ष हा एनडीएमध्ये सामिल होईल. पण या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल.

पण दुसरीकडे शरद पवार यांच्या निवृत्तीची बातमी जोर धरत असताना नागपुरात रोहित पवारांनी अचानक रात्री पक्षातील युवा नेत्यांसोबत बैठक घेतली. महत्त्वाचे म्हणजे रोहित पवार यांच्या एकला चलो रे यावरून पक्षातून त्यांच्याविरोधात नाराजी आहे, असे वृत्त समोर आले होते. पण सु्प्रिया सुळे यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. मग मुंबईला रात्री रवाना होण्यापूर्वी रोहित पवार यांनी युवा नेत्यांसोबत बैठक का घेतली.

नागपुरात रोहित पवारांची युवा नेत्यांसोबत चर्चा

येत्या हिवाळी अधिवेशनात रोहित पवारवर हे आक्रमक राहणार आहे. ते  शेगाव ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे. या ट्रॅक्टर मोर्चा नियोजनाबाबत रोहित पवार यांनी  युवा नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी ही तातडीने बैठक घेतली. 

हेसुद्धा वाचा -  'शरद पवार, सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला मदत करतात, मग...'; 'भाजपची बी-टीम' उल्लेख करत अंजली आंबेडकरांचं विधान

या मोर्चावरून खासदास सुप्रिया सुळे नाराज आहे, असं बोलतं जात होतं. पण त्यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. पक्षातील वरिष्ठांना विश्वासात न घेता मोर्चाची घोषणा केल्यामुळे पक्षात त्यांच्याबद्दल नाराजी आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार पक्षात एकटे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण पक्षाची भाजपशी जवळीक वाढत असल्याने रोहित पवार पक्षापासून दुरावले आहे, अशी चर्चा आहे. 

4 डिसेंबरपासून न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा

शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासाठी रोहित पवारांनी न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिलीय... बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून मोर्चाला 4 डिसेंबरला मोर्चाला सुरूवात होईल, तर 9 डिसेंबरला नागपुरातील विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे... दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत देण्याची प्रमुख मागणी आहे... रोहित पवारांनी जारी केलेल्या मोर्चाच्या पोस्टरवर फक्त शरद पवारांचा फोटो पहायला मिळतोय...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES