SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडले; प्रविण तरडे यांनी घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

‘उत्सव बांधिलकीचा, झी २४ तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी’ या उपक्रमांतर्गत झी २४ तासच्या टीमने बीड जिल्ह्यातील शिंगारवाडी गावात ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. या उपक्रमात अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेत्री अलका कुबल यांनीही सहभाग घेतला.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 10, 2026, 20:23 IST | Updated: Nov 10, 2026, 20:26 IST
Join

प्रवीण तरडे :  'झी २४तास' च्या ‘उत्सव बांधिलकीचा – झी 24 तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी’ उपक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सहभाग घेतला. यावेळी आर्थिक अडचणीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या पुण्यातील कॉलेजच्या विद्यार्थिनीला तरडेंनी मदतीचा हात दिला. या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी तरडेंनी घेतली आहे. 

उत्सव बांधिलकीचा या झी २४ तासच्या उपक्रमात पाथर्डीतील वाघदरा तांडा ग्रामस्थांबरोबर  दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडेंनी मनमोकळा  संवाद साधला. यावेळी तरुण ग्रामस्थांच्या आग्रहास्तव प्रवीण तरडेनी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेतील एक संवाद म्हटला.  तरडेंचा हा प्रत्यक्ष डायलॉग ऐकून ग्रामस्थांनी मनापासून दाद दिली. 

यावेळी  प्रविण तरडे यांनी येथील तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जुईली नावाच्या विद्यार्थीनीने  आर्थिक अडचणीमुळे अर्धवट शिक्षण सोडल्याचे  प्रविण तरडे यांना  सांगितले. फक्त तिचे एकच वर्ष राहिले होते तिने असे त्यांना समजले.  यावेळी  प्रविण तरडे यांनी तात्काळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधला आणि अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलीचे शिक्षण पूर्ण होण्यासाठा मदत करावी असं आवाहन केले. 

एकमेकांमध्ये आपुलकी, प्रेम वाढावं म्हणून आपण सारेच सण साजरे करतो. मात्र दुष्काळामुळे महाराष्ट्रातील गावागावात अनेकांच्या आयुष्यात अंधार दाटला आहे. समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून झी 24 तासनं उत्सव बांधिलकीचा हा उपक्रम सुरु केला. हाच उपक्रम पाथर्डीतील वाघदरा तांडा इथं पार पडला. शेतक-यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांत सहभागी झाले.

यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक रेला नृत्य सादर करून प्रवीण तरडे आणि झी 24 तासच्या टीमसोबत दिवाळी साजरी केलीच दिवाळीचा खरा अर्थ केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचा एक दिवा लावण्यात आहे. म्हणूनच दुष्काळनं होरपळलेल्या या कुटुंबांना सणाच्या काळात आपुलकीचा आधार देणे, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे.

झी २४ तासवर प्रसारित झालेला कार्यक्रम ग्रामस्थांनी उत्साहाने पाहिला. मात्र, गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही कुटुंबांनी चक्क मोबाईलवर कार्यक्रम पाहण्याचा पर्याय निवडला. वृत्तवाहिनीने थेट गावात येऊन ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने गावकऱ्यांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. या उपक्रमातून बळीराजाशी नातं जोडत दिवाळीचा आनंद गावकऱ्यांसोबत द्विगुणित करण्यात आला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES