Rising Asia Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील राजकीय संबंध हे किती तणावाचे आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील संबंध सुद्धा आता तणावाचे झालेत. आशिया कप 2025 मध्ये झालेल्या सामन्यानंतर आता आशिया कप राइजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात ड्रामा पाहायला मिळाला होता. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावर आक्रमक हावभाव आणि भांडण पाहायला मिळालं होतं, ज्याची खूप चर्चा देखील झाली होती. याप्रकरणी आता पाकिस्तान ए संघाने इंडिया ए चा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या विरुद्ध तक्रार केली आहे.
आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेतच्या ग्रुप स्टेज सामन्यात रविवारी इंडिया ए आणि पाकिस्तान ए संघाची टक्कर झाली होती. या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजी दरम्यान हर्षित राणाने अनेकदा पाकिस्तान संघाच्या खेळाडूंची स्लेजिंग केली आणि आक्रमकता दाखवली. पाकिस्तानी फलंदाज सुद्धा त्याच्याशी मैदानात हुज्जत घालतच होते. हे प्रकरण इंडिया ए च्या फलंदाजी दरम्यान सुद्धा पाहायला मिळाला. खास करून हर्षित राणाची विकेट पडल्यावर अनेक पाकिस्तानी खेळाडू त्याच्यासाठी वाईट शब्द वापरून त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अंपायरला मध्ये पडावं लागलं.
या सामन्यानंतर आता पाकिस्तान ए ने मॅच रेफरीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तान मीडियाने दावा केला आहे की दोहामध्ये सुरु असलेल्या आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तान ए संघाच्या मॅनेजमेंटने मॅच रेफरी नईम-उर-रशीदजवळ हर्षित राणाची तक्रार केली आहे. यात हर्षित राणा शिवाय अन्य काही खेळाडूंचा देखील उल्लेख करण्यात आलेला असून त्यांची सुद्धा तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र यावर अशियन क्रिकेट काउन्सिलकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अशियन क्रिकेट काउन्सिलने या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही, तसेच कोणतीही कारवाईही केलेली नाही.
भारताने गमावला होता सामना :
इंडिया ए आणि पाकिस्तान ए यांच्यात रविवार 22 नोव्हेंबर रोजी सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 313 धावांचा स्कोअर उभा केला. याच्या उत्तरात कर्णधार तिलक वर्माने शतकीय खेळी केली मात्र इंडिया ए फक्त 265 धावा करू शकली. 78 धावांच्या मोठ्या फरकाने भारताचा पराभव झाला. जर सेमी फायनल सामने जिंकून भारत ए आणि पाकिस्तान ए हे फायनलला पोहोचले तर यांच्यात सामना पार पडेल.