• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'राजीव गांधींची सुरक्षा मुद्दाम हटवली, जेणेकरुन हत्या व्हावी', राहुल गांधींच्या आरोपानं देशाच्या राजकारणात खळबळ!

'राजीव गांधींची सुरक्षा मुद्दाम हटवली, जेणेकरुन हत्या व्हावी', राहुल गांधींच्या आरोपानं देशाच्या राजकारणात खळबळ!

राजीव गांधी यांची सुरक्षा मुद्दाम हटवण्यात आली होती, असा राहुल गांधींचा आरोप. सोनिया गांधी यांनी बिहार दौऱ्यातील दगडफेक आणि राहुल यांनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण सांगितली.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 24, 2026, 17:16 IST|Updated: Nov 24, 2026, 17:29 IST
joinshare
'राजीव गांधींची सुरक्षा मुद्दाम हटवली, जेणेकरुन हत्या व्हावी', राहुल गांधींच्या आरोपानं देशाच्या राजकारणात खळबळ!
Image Credit: राहुल गांधींचे आरोप (फोटो सौजन्य-गुगल)

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'

2

'राजीव गांधींची सुरक्षा मुद्दाम हटवली, जेणेकरुन हत्या व्हावी', राहुल गांधींच्या आरोपानं देशाच्या राजकारणात खळबळ!

3

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक, 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीची कमाल

4

6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

5

भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या तीन दशकांहून अधिक काळानंतर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वडिलांची सुरक्षा जाणीवपूर्वक हटवण्यात आली होती, असा गंभीर आरोप केला आहे. ‘ती केवळ प्रशासकीय चूक नव्हती, तर त्यामागे हेतू होता,’ असे राहुल यांनी म्हटले. आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या एका व्हिडीओ संवादात त्यांनी हा दावा केला. या चर्चेत राजीव गांधी यांच्या सुरक्षेबरोबरच सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये पंतप्रधानपद नाकारण्याचा घेतलेला निर्णयही चर्चेत आला. काय म्हणाले राहूल गांधी? सविस्तर जाणून घेऊया.

‘सुरक्षा हटवण्यामागे हेतू होता’

सोनिया गांधी यांच्या बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकाच्या निमित्ताने राहुल, सोनिया आणि प्रियंका गांधी यांनी कुटुंबातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. या संवादात राहुल यांनी राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. वडिलांची सुरक्षा केवळ अपघाताने किंवा निष्काळजीपणामुळे कमी झाली नव्हती, तर त्यांना धोका निर्माण होईल असे वातावरण तयार करण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.

बिहार दौऱ्यात दगडफेक

सोनिया गांधी यांनी 1991 मधील बिहार दौऱ्याचा प्रसंग सांगितला. त्यावेळी राजीव गांधी विरोधी पक्षनेते होते. ते उघड्या जीपमधून प्रचार करत असताना त्यांच्या दिशेने दगडफेक झाली आणि घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल गांधी त्या दौऱ्यात वडिलांसोबत होते. हा अनुभव पाहिल्यानंतर त्यांनी घरी परतल्यावर सोनिया गांधी यांना वडिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. सुरक्षा व्यवस्था सुधारली नाही, तर लवकरच वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी परतावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केल्याचे सोनिया यांनी सांगितले.

सोनिया गांधी घराच्या सुरक्षेवरही ठेवायच्या लक्ष

इंदिरा गांधी यांच्या 1984 मधील हत्येनंतर सोनिया गांधी राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत सतत काळजीत असायच्या, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. घराभोवतीच्या काटेरी तारांची तपासणी करणे, सुरक्षारक्षक जागे आहेत की नाही हे पाहणे, अशा गोष्टी सोनिया स्वतः करत असत. प्रियंका यांच्या खोलीतून घराचा पुढचा भाग दिसत असल्याने वडील घरी परतल्याच्या पावलांचा आवाज ऐकेपर्यंत त्या झोपत नसत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

21 मे 1991 रोजी राजीव गांधींची हत्या

राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तमिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे आत्मघातकी बॉम्बस्फोटात हत्या झाली. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते. त्यांच्या हत्येनंतर सुरक्षेतील त्रुटी आणि संभाव्य निष्काळजीपणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला होता.

2004 मध्ये सोनिया गांधींनी का नाकारले पंतप्रधानपद?

या चर्चेत सोनिया गांधी यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपद स्वीकारण्याबाबतचा संभ्रमही व्यक्त केला. काँग्रेसच्या विजयासाठी देशभर मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांप्रती आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यामुळे पद नाकारल्यास कार्यकर्त्यांना निराश केल्यासारखे वाटेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, अखेरीस त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले नाही आणि डॉ. मनमोहन सिंह यांची पंतप्रधानपदी निवड झाली. सोनिया यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर उपस्थित अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता, असे राहुल गांधींनी म्हटलंय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rahul Gandhi
congress