मतदार यादीची सखोल तपासणी करण्यासाठी देशात एसआयआर प्रथमच होत आहे, असे नाही. 1952 पासून 2004 पर्यंत आठ वेळा ही प्रक्रिया झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांभी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग गांच्या काळात एसआयआर झाली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामकाजावरील याचिकेला निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिले आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली आहे.
अपघातात सहभागी असलेली पाच वाहने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ताफ्याच्या मागील भागात होती.
दिल्लीतील व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहीले आहे. 1 नोव्हेंबरची इंडिया आघाडी रॅली पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा दिला आहे.
सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची पहिली भेट केंब्रिजमधील ग्रीक रेस्टॉरंटमध्ये झाली. राजीव गांधींच्या कोणत्या गुणाने सोनिया यांचे मन जिंकले? त्यांच्या प्रेमकहाणीचा किस्सा जाणून घेऊया.
भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी प्रियंका गांधींचा राहुल गांधींवरील विश्वास उडाला आहे का? अशी विचारणा केली आहे. वादाच्या जोरावर प्रियंका गांधी आपला आपल्या मुलाचं सॉफ्ट लाँचिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधींचा विमानातील व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधी व्हिएतनामला निघून गेल्याचा दावा भाजपाने केला आहे.
राहुल गांधींच्या मागे उभी असलेली ही तरुणी इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. ही तरुणी आहे तरी कोण? नेमकं ती काय काम करते? तिचं या बड्या नेत्याशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या सविस्तरपणे...
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढलेला मोर्चा आणि न्यायालयाच्या परिसरात केलेल्या निदर्शनांच्या संदर्भात कडक टिप्पणी केली.
इंडिया आघाडीच्या एसआयआरविरोधातील याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे. दिग्विजय सिंह आणि असदुद्दीन ओविसी यांच्या याचिकेवर देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
संपूर्ण राज्यासहीत देशाला हादरवून सोडणारं अंकिता भंडारी प्रकरण आता राजकीय कारणांमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. नेमकं 2022 मध्ये काय घडलं होतं? ही अंकिता आहे तरी कोण? आता हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
दुष्यंत गौतम यांची नुकतीच सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या विरोधात अंकिता भंडारीचे आई-वडील इंडिया गेटवर धरणे आंदोलन करत आहेत.
राहुल गांधींसोबत असलेल्या NSUI च्या आंदोलकांनी पोलिसांवर छळाचा आरोप केला आहे. पोलीस कोठडीत असताना आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे. पोलिसांनी एका आंदोलकाच्या डोक्यावर लाठीने प्रहार केला आणि त्याचा चेहरा ओरबडला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक झाले असताना, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
भाजप नेते पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, परंतु स्वतःच्याच कामगिरीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करते, असे त्यांनी म्हटले आहे.